Join us

ही मराठमोळी अभिनेत्री पुन्हा एकदा करणार छोट्या पडद्यावर कमबॅक; दिसणार खडूस बॉसच्या भूमिकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2022 14:29 IST

अभिनेत्री मनवा नाईक(Manava Naik) हिच्या स्ट्रॉबेरी या निर्मिती संस्थेची ही मालिका आहे. 

सोनी मराठी (Sony Marathi) वाहिनी एक नवी कोरी मालिका लवकरच प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. 'बॉस माझी लाडाची' या आगामी मालिकेचा प्रोमो प्रेक्षकांना नुकताच पाहायला मिळाला. अभिनेत्री भाग्यश्री लिमये (Bhagyashree limaye) , नवोदित अभिनेता आयुष्य संजीव हे या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. गिरीश ओक, रोहिणी हट्टंगडी, माधवी जुवेकर हे नावाजलेले कलाकार देखील या प्रोमोत दिसत आहेत. मनवा नाईक हिच्या स्ट्रॉबेरी या निर्मिती संस्थेची ही मालिका आहे. 

या मालिकेचा प्रोमो पाहून प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे. अभिनेत्री भाग्यश्री लिमये दोन वर्षानंतर पुन्हा छोट्या पडद्यावर दिसणार आहे. भाग्यश्रीने या आधीही आपल्या अभिनयाने आणि नरागसतेने सर्व प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. पण या वेळी मात्र ती एका खडूस बॉसच्या रूपात प्रेक्षकांसमोर येणार आहे. तिचा हा नवीन अवतार प्रेक्षकांना आवडतो का आणि काय असणार आहे ही 'बॉस माझी लाडाची' मालिका हे लवकरच प्रेक्षकांना पाहता येणार आहे सोनी मराठी वाहिनीवर.  

या प्रोमोवर प्रेक्षकांच्या उत्तम प्रतिक्रिया आल्या असून सगळ्यांचं ही नवी मालिका बघण्याची उत्सुकता लागली आहे. लवकरच सोनी मराठी वाहिनीवर ही मालिका प्रेक्षकांना पाहायला मिळेल.

टॅग्स :टिव्ही कलाकारसोनी मराठी