Join us
Daily Top 2Weekly Top 5

ही प्रसिद्ध मराठमोळी अभिनेत्री 'बँड बाजा वरात'शोमधून करतेय कमबॅक, नाव वाचून व्हाल थक्क

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2022 18:06 IST

'बँड बाजा वरात' (Band BajaVarat) या शोचं पुष्कराजसोबत एक प्रसिद्ध अभिनेत्री या शोच सूत्रसंचालन करणार असल्याचं दिसतंय.

झी मराठीवर( Zee Marathi ) लवकरच 'बँड बाजा वरात' (Band BajaVarat) हा कार्यक्रम सुरु होणार आहे. हा कार्यक्रम लग्नाशी संबंधीत आहे, एवढं तर या प्रोमोवरून प्रेक्षकांच्या लक्षात आलं आहे. या कार्यक्रमाच्या सूत्रसंचलनाची जबाबदारी ज्यांच्याकडे आहे, त्या व्यक्ती या प्रोमोमध्ये दिसत आहे. या शोचं होस्ट दिल दोस्ती दुनियादारी फेम आशु म्हणजेच पुष्कराज चिरपुटकर करणार हे आम्ही तुम्हाला आधीच सांगितलं होते. त्यानंतर झी ने आणखी एक प्रोमो रिलीज केला आहे ज्यात पुष्कराजसोबत  एक प्रसिद्ध अभिनेत्री या शोच सूत्रसंचालन करणार असल्याचं दिसतंय. 

या अभिनेत्रीने मराठी आणि हिंदीत काम केलं आहे. ती दुसरी तिसरी कुणी नसून रेणुका शहाणे आहे. 'झी'ने प्रसारित केलेल्या प्रोमोमध्ये फटाकेच्या जल्लोषात रेणुका शहाणेची एंट्री होती. तिला पाहुन पुष्कराज विचारतो रेणुका ताई कुठे निघालात? यावर रेणुका शहाणे म्हणते लग्नाला, यावर तिला पुष्कराज विचारतो आहेर काय घेतलात? रेणुका शहाणे म्हणते हा काय आहेर. यातून एक गिफ्ट्सने भरलेला ट्रकसमोर येतो. यावरुन हा रिअॅलिटी शो असल्याचा अंदाज आपल्याला येतो.  ‘लोकमत फिल्मी’ला मिळालेल्या माहितीनुसार, झी मराठीवरचा ‘हे तर काहीच नाय’ हा शो बंद होणार असून त्याची जागा ‘बँड बाजा वरात’ हा नवा कोरा शो घेणार आहे. लग्न ठरलेल्या जोडप्यांसाठी हा शो असल्याचं कळतंय. हा कार्यक्रम १८ मार्च पासून शुक्रवार आणि शनिवार रात्री ९.३० वाजता प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 

 रेणुका शहाणेने आजवर अनेक मराठी आणि हिंदी सिनेमात काम केलं आहे. 'हम आपके हैं कौन' या सिनेमातील तिनं साकारलेली भूमिका रसिकांना प्रचंड भावली. या सिनेमातील तिचं हास्य, अभिनय याची रसिकांवर जादू झाली होती. 'सुरभी' या छोट्या पडद्यावरील शोमधूनही तिने रसिकांची मने जिंकली होती.रेणुका शहाणे अभिनयाबरोबर एक उत्तम दिग्दर्शकही आहेत हे त्यांनी २००९ साली आलेल्या रीटा या सिनेमाने दाखवून दिलं होतं.

टॅग्स :रेणुका शहाणेझी मराठी