Join us
Daily Top 2Weekly Top 5

ही अभिनेत्री साकारणार 'आई तुळजाभवानी'ची भूमिका, नवीन प्रोमोने चाहत्यांची उत्सुकता शिगेला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2024 08:26 IST

कलर्स मराठीवर कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मालिकेचा प्रोमो व्हायरल झालाय. या प्रोमोत तुळजाभवानीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीची झलक बघायला मिळतेय (colors marathi, aai tulja bhawani)

सध्या कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीच्या नवीन सीझनची चांगलीच चर्चा आहे. काही दिवसांपूर्वी कलर्स मराठीवर दुर्गा ही नवी मालिका सुरु झाली. आता कलर्स मराठीवर काल आई तुळजाभवानी या नवीन मालिकेचा प्रोमो रिलीज झालाय.  अवघ्या महाराष्ट्राची कुलस्वामिनी 'आई तुळजाभवानी'ची गाथा या मालिकेच्या माध्यमातून उलगडणार आहे. या मालिकेत प्रमुख भूमिका कोण साकारणार, याचा उलगडा झाला नव्हता. परंतु काल मालिकेच्या नवीन प्रोमोमध्ये तुळजाभवानी मातेची भूमिका कोण सााकारणार, याचा खुलासा झाला आहे.

ही अभिनेत्री झळकणार आई तुळजाभवानीच्या भूमिकेत

'आई तुळजाभवानी'च्या रुपात अभिनेत्री पूजा काळे दिसणार आहे. 'आई तुळजाभवानी' मालिकेचा टीझर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाल्यापासून ही मालिका विशेष चर्चेत आहे. आता या मालिकेत तुळजाभवानीची भूमिका अभिनेत्री पूजा काळे साकारणार असल्याने चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झालीय. पूजा भरतनाट्यम नृत्यांगना असून तिने विशारद पूर्ण केले आहे. तसेच कथ्थकचंही शिक्षण तिने घेतलं आहे.

पूजा काळे भूमिकेबद्दल काय म्हणाली?

'आई तुळजाभवानी' मालिकेतल्या मुख्य भूमिकेबद्दल पूजा काळे म्हणाली,"आई तुळजाभवानी'ची भूमिका साकारताना आसपास खूप सकारात्मक ऊर्जा जाणवतेय. पहिली मालिका आणि आव्हानात्मक भूमिका साकारणं ही एक मोठी जबाबदारी आहे. मालिकेची संपूर्ण अनुभवी टीम आणि तिचे नेतृत्व करणारे राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक मकरंद माने यांच्या मार्गदर्शनाने 'आई तुळजाभवानी' ही भूमिका मनापासून साकारुन प्रेक्षकांच्या विश्वासाला सार्थ उतरेन असा दृढ विश्वास मी व्यक्त करते". अवघ्या महाराष्ट्राची 'कुलस्वामिनी' असलेली 'आई तुळजाभवानी' मालिका लवकरच 'कलर्स मराठी'वर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

टॅग्स :टेलिव्हिजनकलर्स मराठी