Join us
Daily Top 2Weekly Top 5

'ठिपक्यांची रांगोळी' फेम अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकरने ठाण्यात घेतलं नवं घर, आई-बाबांसोबत केला गृहप्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2024 15:01 IST

ठिपक्यांची रांगोळीमधील अप्पूच्या भूमिकेने लोकप्रिय झालेली अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकरने नवं घर घेतलं आहे. पाहा तिच्या नवीन घराची झलत (dnyanada ramtirthkar)

'ठिपक्यांची रांगोळी' मालिका सर्वांच्या आवडीची. या कौटुंबिक मालिकेने प्रेक्षकांचं चांगलं प्रेम मिळवलं. या मालिकेत ज्ञानदा रामतीर्थकर प्रमुख भूमिकेत होती. ज्ञानदा गेली अनेक वर्ष मनोरंजन विश्वात कार्यरत असली तरीही तिला या मालिकेमुळे खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. ज्ञानदाच्या वैयक्तिक आयुष्यात एक आनंदाची गोष्ट घडलीय. ज्ञानदाने ठाण्यात नवीन घर घेतलं असून तिने आई-बाबांसोबत नवीन घरात प्रवेश केलाय. 

ज्ञानदाने ठाण्यात घेतलं नवं घर

अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकरने ठाण्यात नवं घर घेतल्याचा व्हिडीओ लोकतम फिल्मीकडून इन्स्टाग्रामवर पोस्ट करण्यात आलाय. या व्हिडीओत ज्ञानदाचे आई-बाबा नवीन घरात गृहप्रवेश करताना दिसत आहेत. याशिवाय नवीन घरात आई-बाबांच्या हस्ते ज्ञानदाने कलश पूजन केलं. पुढे ज्ञानदाने संपूर्ण घरात फेरफटका मारला असून आनंदाने नवीन घरात प्रवेश केला. ज्ञानदाच्या चाहत्यांनी कमेंटमध्ये तिचं अभिनंदन करुन नवीन घर घेतल्याबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत.

 

 

ज्ञानदाचं वर्कफ्रंट

ज्ञानदा रामतीर्थकरच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर, ज्ञानदाची भूमिका असलेली 'कमांडर करण सक्सेना' ही वेबसीरिज हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झालीय. या वेबसीरिजमध्ये ज्ञानदाने एका कोळी मुलीची भूमिका साकारलीय. ज्ञानदासोबत या वेबसीरिजमध्ये मराठमोळी अभिनेत्री हृता दुर्गुळे झळकत आहे. याशिवाय अभिनेता गुरमीत चौधरी सीरिजमध्ये प्रमुख भूमिकेत पाहायला मिळतोय. ज्ञानदाची ही पहिली हिंदी वेबसीरिज आहे. याआधी स्टार प्रवाहवर ज्ञानदाची प्रमुख भूमिका असलेली मालिका खूप गाजली

टॅग्स :सुंदर गृहनियोजनठाणे