Join us
Daily Top 2Weekly Top 5

भर पावसात छत्री आणि कणीसं विकतोय सुप्रसिद्ध अभिनेता, फोटो सोशल मीडियावर व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2023 18:05 IST

अभिनेत्याचे कणीस आणि छत्री विकतानाचे फोटो व्हायरल, वेधलं चाहत्यांंचं लक्ष

प्रसिद्ध कॉमेडियन आणि अभिनेता सुनील ग्रोव्हर सध्या कलाविश्वापासून दूर आहे. ‘द कपिल शर्मा शो’मध्ये गुत्थी, डॉ. गुलाटी, रिंकु देवी अशा अनेक भूमिकांमुळे त्याला प्रसिद्धी मिळाली. कपिल शर्माबरोबर वाद झाल्याने सुनील ग्रोव्हरने शोला रामराम केला होता. या शोमुळे त्याच्या चाहत्या वर्गात भर पडली होती. लाइमलाइटपासून दूर असला तरी सुनिल ग्रोव्हर सोशल मीडियावरुन चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करतो.

सुनिल ग्रोव्हरने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन काही फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. यातील एका फोटोमध्ये तो भर पावसात छत्री विकताना दिसत आहे. ग्रोव्हरने शेअर केलेल्या या फोटोमध्ये त्याच्या समोर काही छत्र्या दिसत असून पावसात तो त्या विकताना दिसत आहे. या फोटोला त्याने “एवढ्या पावसात माझी स्वत:ची छत्रीदेखील विकली गेली”, असं कॅप्शन दिलं आहे. याबरोबरच त्याने आणखी एक व्हिडिओही शेअर केला आहे.

“...म्हणून कोणी मत देत नाही”, अमित ठाकरेंच्या टोलनाका प्रकरणानंतर मराठी अभिनेत्याचं ट्वीट

छत्रीबरोबरच सुनील ग्रोव्हर मक्याची कणीसंही विकत आहे. त्याने इन्स्टाग्रामवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तो हातगाडीवर बसून कणीसं भाजताना दिसत आहे. त्याच्या या व्हिडिओवर चाहत्यांबरोबरच सेलिब्रिटींनीही कमेंट केल्या आहेत.

“राजकारण्याच्या मुलाबरोबर मी रिलेशनशिपमध्ये होते”, शर्लिन चोप्राचा खुलासा, म्हणाली, “तो सेक्ससाठी...”

दरम्यान, सुनील ग्रोव्हरने हिंदीबरोबरच अनेक गुजराती मालिकांमध्येही काम केलं आहे. अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्येही त्याने महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. ‘मै हूं ना’, ‘गजनी’, ‘हिरोपंती’, ‘बाघी’, ‘गब्बर इज बॅक’ या चित्रपटांत तो दिसला होता. शाहरुख खानच्या ‘जवान’ चित्रपटातही सुनील ग्रोव्हर दिसणार आहे.

टॅग्स :सुनील ग्रोव्हरद कपिल शर्मा शो