Join us

'नकुशी' मालिकेतील ही प्रसिद्ध अभिनेत्री अडकली विवाहबंधनात, फोटो झाले व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2022 18:09 IST

सध्या लग्नाचा सिजन आहे. बॉलिवूडसह मराठी सिनेसृष्टीतही लग्नाचे वारे वाहतायेत.

सध्या लग्नाचा सिजन आहे. बॉलिवूडसह मराठी सिनेसृष्टीतही लग्नाचे वारे वाहतायेत. पण सध्या मराठी टेलिव्हिजनवरील एक अभिनेत्री अलीकडेच लग्नाच्या बेडीत अडकली आहे. ती कोण आहे असा प्रश्न तुम्हाला पडला असेलच ना...स्टार प्रवाह वाहिनीवरील 'नकुशी' (Nakushi)मालिकेत ती मुख्य अभिनेत्री होती. या मालिकेतून ती घराघरात पोहोचली. नकुशी या मालिकेतून प्रसिद्धीने नकुशीची भूमिका साकरली होती. नकुशीची भूमिका साकारणारी अभिनेत्री प्रसिद्धी किशोर (Prasiddhi Kishor) हिने अलीकडेच लग्नगाठ बांधली आहे.

प्रसिद्धीचा 5 फेब्रुवारी रोजी दुबई स्थित ओंकार वर्तकसोबत लग्न सोहळा पार पडला आहे. सोशल मीडियावर तिने फोटो शेअर करत ही माहिती आपल्या चाहत्यांना दिली आहे. यानंतर चाहत्यांनी तिच्या अभिनंदन आणि शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. प्रसिद्धी किशोरने ओंकारसोबत मागील वर्षी साखरपुडा गेला होता. अभिनेत्री प्रसिद्धी किशोर हिचा नवरा ओंकार वर्तक  (Omkar Vartak) सध्या दुबईमध्ये कार्यरत आहे. त्यामुळे ती ओंकारसोबत दुबईत स्थायिक होईल असे बोलले जात आहे.पारंपारिक पद्धतीने थाटात या दोघांचा विवाहसोहळा पार पडला. 

प्रसिद्धीने नकुशी या मालिकेअगोदर ‘ते दोन दिवस’ या चित्रपटात मुख्य नायिकेची भूमिका साकारली होती. मालिका, चित्रपट आणि नाटक अशा तिन्ही क्षेत्रात प्रसिद्धीने अभिनयाची छाप सोडली आहे. प्रसिद्धी किशोर आयलवार ही मूळची नागपूरची. कलेचा वारसा तिला घरातूनच मिळाला आहे. प्रसिद्धीचे वडील किशोर आयलवार हे देखील नाट्यअभिनेते म्हणून ओळखले जातात.

टॅग्स :टिव्ही कलाकारस्टार प्रवाह