Join us
Daily Top 2Weekly Top 5

'सुंदरा मनामध्ये भरली' मालिकेत होणार 'या' अभिनेत्रीची एंट्री, जाणून घ्या तिच्याविषयी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2022 17:18 IST

‘सुंदरा मनामध्ये भरली’ (Sundara Manamadhye Bharli ) या मालिकेनं प्रेक्षकांना वेड लावलं. मालिकेतील लतिका आणि अभ्याची जोडीनं प्रेक्षकांची मनं जिंकलीत

‘सुंदरा मनामध्ये भरली’ (Sundara Manamadhye Bharli ) या मालिकेनं प्रेक्षकांना वेड लावलं. मालिकेतील लतिका आणि अभ्याची जोडीनं प्रेक्षकांची मनं जिंकलीत. सध्या ही मालिका एका वेगळ्यारंजक वळणावर आलेली पाहायला मिळतेय. काही महिन्यांपूर्वी या मालिकेतून कामिनीने एक्झिट घेतली होता. कामिनी  नकारात्मक भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री पूजा पुरंदरे(pooja purandare) हिने ही मालिका सोडली होती. 

त्यानंतर आता पुन्हा एकदा मालिकेत कामिनीची रिएंट्री होणार आहे. आता या मालिकेत श्वेता नाईकची एंट्री होणार आहे. ती कामनिची भूमिका साकारणारी. पूजा याआधी सोनी मराठीवरील क्रिमिनल्स चाहुल गुन्हेगारीची. कामिनीची भूमिका जरी नकारात्मक असली तरी तिचा सोशल मीडियावर प्रचंड चाहता वर्ग होता. त्यामुळे कामिनीची एक्झिट झाल्यानंतर प्रेक्षक नाराज झाले होतं.  आता कामिनीची मालिकेत रिएंट्री होणार असल्याने ती पाहण्याासाठी प्रेक्षक नक्कीच उत्सुक असतील. 

अनेक कलाकारांनी सोडली मालिकानुकतीच या मालिकेतून नंदिनीने देखील निरोप घेतला आहे. ‘सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकेत नंदिनीची भूमिका साकारणारी अभिनेत्री आदिती द्रविडने तिचा ट्रॅक संपल्यामुळे मालिकेचा निरोप घेतला आहे. काही दिवसांत अनेक कलाकारांनी ‘सुंदरा मनामध्ये भरली’ ही मालिका सोडली आहे. अभ्याच्या वहिनीची भूमिका साकारणारी अभिनेत्री प्रणिती नरकेने सोडली आहे. दौलतच्या आबाची भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते धनंजय वाबळे यांनी देखील ही मालिका सोडली. लतिकाच्या बहिणीची भूमिका साकारणारी गौरी किरण हिने मालिका सोडलेली आहे. 

टॅग्स :टिव्ही कलाकारकलर्स मराठी