स्टार प्रवाह (Star Pravah) वाहिनीवरील लोकप्रिय मालिका 'रंग माझा वेगळा' (Rang Maza Vegla)ने कमी कालावधीत रसिकांच्या मनात घर केले. या मालिकेतील सर्वच पात्रांना प्रेक्षकांची पसंती मिळताना दिसते आहे. दरम्यान या मालिकेतील एका अभिनेत्रीने ब्रेक घेतल्याचे समजते आहे. ही अभिनेत्री कोण असेल आणि तिने ब्रेक का घेतला असेल, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल ना. तर ही अभिनेत्री म्हणजे रंग माझा वेगळा मालिकेत दीपाची मैत्रीण साक्षी. साक्षीची भूमिका अभिनेत्री मानसी घाटे (Manasi Ghate) हिने साकारली आहे. तिने ब्रेक घेण्यामागचे मोठे कारण समोर आले आहे.
रंग माझा वेगळा मालिकेत साक्षीची भूमिका अभिनेत्री मानसी घाटे हिने साकारली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मानसी घाटे हिची तब्येत खूप बिघडल्यामुळे तिने मालिकेतून ब्रेक घेतला आहे. इतकेच नाही तर तिला लगेच मालिकेत रुजू होता येणार नाही आहे. तिला डॉक्टरांनी सक्त आराम करण्याची ताकीद दिली आहे. त्यामुळे काही दिवस मानसी घाटे आपल्याला मालिकेत पाहायला मिळणार नाही.