Tharl Tar Mag: 'ठरलं तर मग' मालिक सध्या नवनवीन ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. अर्जुनने वात्सल्य आश्रम केसचा तपास आता पुन्हा नव्याने सुरु केला आहे.या केसमध्ये अनेक महत्वाचे पुरावे त्याच्या हाती लागले. त्यामुळे पुढील चौकशीसाठी त्याने प्रियाला नोटीस बजावल्याचा सीक्वेमस पाहायला मिळतोय. परंतु प्रिया मोठ्या हुशारीने चौकशीपासून कसा स्वत चा बचाव करता येईल, यासाठी खोटी कारणं देते. पण, अर्जुनने कोर्टाच्या परवानगीने तज्ञ्जांच्या उपस्थित प्रियाची चौकशी असे ऑर्डर्स काढून तिची चौकशी करतो. शिवाय तिची चांगलीच कोंडी करतो. त्यात आता मालिकेचा नवा प्रोमो स्टार प्रवाह वाहिनीने शेअर केला आहे.
वात्सल्य आश्रमात विलासचा खून झाला त्यापूर्वी ती साक्षीला ओळखतही नव्हती असं सगळ्यांना सांगते. अगदी तिचे वडील रविराज किल्लेदार यांच्याशी देखील ती खोटं बोलते. इतके दिवस खोटं बोलून सर्वांना अंधारात ठेवणाऱ्या प्रियाचा खोटारडेपणा आता अर्जुन कोर्टासमोर उघड करणार आहे. दरम्यान, मालिकेचा हा आगामी भाग पाहण्यासाठी प्रेक्षक देखील प्रचंड उत्सुक आहेत. त्यामुळे विलास मर्डर केस आता कोणतं नवं वळण घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.