Join us

"आमच्या पप्पांनी गणपती आणला", 'ठरलं तर मग' फेम अमित भानुशालीच्या लेकाचा क्युट व्हिडिओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2024 16:14 IST

अमितच्या छोट्या लेकाचा एक व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये छोटा हृधान "आमच्या पप्पांनी गणपती आणला" हे गाणं म्हणताना दिसत आहे.

'ठरलं तर मग' ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. अल्पावधीतच या मालिकेने प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली. या मालिकेतील सायली-अर्जुनची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. 'ठरलं तर मग' मालिकेत अर्जुन हे पात्र साकारून अभिनेता अमित भानुशली घराघरात पोहोचला. या मालिकेने त्याला लोकप्रियता मिळवून दिली. अनेक मालिका आणि सिनेमात काम केलेल्या अमितच्या चाहत्या वर्गात 'ठरलं तर मग'मुळे भर पडली. 

अमित सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. फॅमिली आणि फ्रेंड्सबरोबरचे अनेक फोटो आणि व्हिडिओ तो चाहत्यांबरोबर शेअर करत असतो. आता अमितच्या छोट्या लेकाचा एक व्हिडिओ समोर आला आहे. अमितची पत्नी श्रद्धा हिने तिच्या इन्स्टाग्रामवरुन लेकाचा व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये अमित आणि श्रद्धाचा छोटा हृधान "आमच्या पप्पांनी गणपती आणला" हे गाणं म्हणताना दिसत आहे. हा व्हिडिओ शेअर करत श्रद्धाने "त्याच्या मनात काय आलं माहीत नाही...त्याने अचानक डॉक्टरांच्या क्लिनिकमध्ये गाणं गायला सुरुवात केली", असं म्हटलं आहे. 

अमितच्या लेकाचा हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. अमितच्या लेकाचा व्हिडिओतील क्यूटनेस चाहत्यांना भावला आहे. त्याच्या या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी कमेंटही केल्या आहेत. "क्यूट एक्सप्रेशन", "छोटा अर्जुन", "किती क्यूट बच्चा...मला वाटतं त्याने क्लिनिकमध्ये बाप्पाची मूर्ती पाहिली असेल", "गोंडस बाळ आहे" अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत. 

दरम्यान, अमित याआधी अनेक मालिकांमध्ये दिसला होता. त्याने 'फक्त लढ म्हणा', 'गर्ल्स' अशा काही सिनेमांमध्येही काम केलं आहे. सध्या अमित 'ठरलं तर मग' मालिकेतून प्रेक्षकांची मनं जिंकत आहे. 

टॅग्स :टिव्ही कलाकारमराठी अभिनेता