Join us
Daily Top 2Weekly Top 5

फोटोत दिसणारी ही क्यूट मुलगी आज आहे टीव्ही इंडस्ट्रीतील टॉपची अभिनेत्री, तुम्ही ओळखलंत ना?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2020 16:50 IST

आपल्या वडिलांसोबत फोटोत दिसणारी क्यूट मुलगी ही आज छोट्या पडद्यावरील एक लोकप्रिय स्टार आहे. एक नाही तर टीव्हीवरील कितीतरी गाजलेल्या मालिकांमध्ये ही अभिनेत्री दिसते.

कोरोना काळात अनेक लोक आपल्या जुनी आठवणी सोशल मीडियावर शेअर आहेत. यात टीव्ही किंवा मोठ्या पडद्यावरील कलाकारही मागे नाहीत. टीव्हीवरील एका लोकप्रिय अभिनेत्रीने तिच्या वडिलांसोबतचा बालपणीचा फोटो शेअर केला. हा फोटो पाहून नक्कीच तुम्ही तिला ओळखलं नसेल. हा फोटो चांगलाच व्हायरल झाला असून लोकांना विश्वासच बसत नाहीये की, या फोटोतील चिमुकली त्यांची आवडती अभिनेत्री आहे.

आपल्या वडिलांसोबत फोटोत दिसणारी क्यूट मुलगी ही आज छोट्या पडद्यावरील एक लोकप्रिय स्टार आहे. एक नाही तर  टीव्हीवरील कितीतरी गाजलेल्या मालिकांमध्ये ही अभिनेत्री दिसते. तिने पंजाबी सिनेमातून आपल्या करिअरला सुरूवात केली होती. आज ती टीव्हीवरील टॉपच्या अभिनेत्रींमध्ये आहे. सोशल मीडियातही तिने लाखो फॉलोअर्स आहेत.

तुम्ही ओळखले काय? जर अजून देखील ओळखले नसेल तर सांगतो की, या अभिनेत्रीचं नाव आहे सुरभी ज्योती. हा..ओळखलं ना? फोटोमध्ये ती आपल्या वडिलांसोबत पाहायला मिळत आहे. लहानपणापासून आतापर्यंत सुरभी ज्योती खूपच बदलली आहे. आज सुरभी टीव्ही इंडस्ट्रीमधील एक प्रसिद्ध नाव आहे. 

तुम्हाला कदाचित माहीत नसेल पण सुरभीने २०१० मध्ये पंजाबी फिल्म इंडस्ट्रीमधून डेब्यू केलं होतं. आतापर्यंत सुरभीने अनेक पंजाबी चित्रपटांमध्ये आणि टीव्ही शोजमध्ये काम केले आहे. इतकेच नाही तर सुरभी 'कुबूल है', 'कोई लौट के आया है', 'देव', 'इश्कबाज', 'नागिन-३', 'ये जादू है जिन्न का' यासारख्या शो मध्ये पाहायला मिळाली आहे.

टीव्हीच्या या संस्कारी बहूचा असाही थाट, लॉकडाऊनमध्ये झाली तिच्या मानधनात वाढ !

SEE PICS : टीव्हीच्या ‘नागीन’वर सगळेच फिदा...! निया शर्माच्या या फोटोंची होतेय चर्चा

'तारक मेहता का उल्टा चश्मा' मालिकेतून ही कलाकार घेणार निरोप, BMW सारख्या गाडींची आहे मालकीण

टॅग्स :टेलिव्हिजनसेलिब्रिटी