Join us
Daily Top 2Weekly Top 5

उंचीमुळे नाकारलं काम, प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितला कटू अनुभव; म्हणाली-"टीव्ही कलाकारांना..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2025 13:14 IST

हिंदी टेलिव्हिजन विश्वातील लोकप्रिय असणाऱ्या नावांपैकी एक नाव म्हणजे करिश्मा तन्ना.

Karishma  Tanna: हिंदी टेलिव्हिजन विश्वातील लोकप्रिय असणाऱ्या नावांपैकी एक नाव म्हणजे करिश्मा तन्ना(Karishma Tanna) .लव्ह स्कुल, नच बलिये यांसारख्या गाजलेल्या मालिकांमधून तिने प्रेक्षकांच्या मनावर अभिनयाची छाप उमटवली. करिश्मा तिच्या अभिनयासह नृत्यकौशल्यामुळे देखील चर्चेत असते. सध्या या अभिनेत्रीने दिलेल्या एका मुलाखतीत लीकडेच तिच्या करिअरच्या सुरुवातीच्या दिवसांबद्दलच्या आठवणी शेअर केल्या आहेत. 

करिश्माने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये अभिनय क्षेत्रात आलेल्या अनुभवांवर भाष्य केलं. तसेच तिने रिजेक्शन  सामना केल्याचंही सांगितलं. या मुलाखतीत करिश्मा म्हणाली,"टीव्ही इंडस्ट्रीने मला खूप काही दिलं आहे. मी आजवर काम करताना निडरपणे कॅमेऱ्यासमोर गेली आहे. स्क्रिप्ट माझ्या अगदी तोंडपाठ असायची. त्यामुळे माझ्यातील आत्मविश्वास वाढू लागला. परंतु, जेव्हा मी चित्रपटांचे ऑडिशन्स द्यायला जायचे तेव्हा कायम मला नकार मिळाला." 

त्यानंतर अभिनेत्रीने सांगितलं की,"अनेकांची अशी मानसिकता असते की जर कोणी टीव्ही इंडस्ट्रीतील कलाकार असेल तर त्याला कास्ट केलं जातं नाही. मला सुद्धा हेच सांगण्यात आलं होतं की, तू खूप उंच आहेस, तू रोज टीव्हीवर दिसतेस,तुला पाहण्यासाठी लोक थिएटरमध्ये का येतील? त्यामुळे चित्रपटासाठी आम्ही तुला घेऊ शकत नाही. असं म्हणत मला रिजेक्ट केलं जायचं. पण, आता मला या सगळ्या गोष्टींचा फरक पडत नाही."असा खुलासा अभिनेत्रीने केला. 

करिश्मा तन्नाने २००१ मध्ये जेव्हा तिने 'क्योंकी सास भी कभी बहू थी'मध्ये इंदू म्हणून छोट्या पडद्यावर पदार्पण केले तेव्हा ती प्रत्येक घरातील लाडकी बनली. त्यानंतर 'पालकी' पासून 'नागिन ३' आणि 'कयामत की रात' सारख्या मालिकांनी तिला सुपरस्टारचा दर्जा दिला.

टॅग्स :करिश्मा तन्नाटिव्ही कलाकार