Join us

"ही वीण तुटायची नाही...", मालिका सोडण्याच्या चर्चांवर तेजश्री प्रधानची पहिली प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2025 12:21 IST

मला माझ्या प्रिय प्रेक्षकांना सांगायचं आहे की..., तेजश्री प्रधानची स्पष्ट प्रतिक्रिया

लोकप्रिय मालिका 'वीण दोघातली ही तुटेना'मध्ये समर आणि स्वानंदीचं डेस्टिनेशन वेडिंग सुरु आहे. समर आणि स्वानंदी अखेर लग्नबंधनात अडकणार आहेत. गोवा येथे मालिकेचं आणि या वेडिंग सीन्सचं शूट होत आहे. सुबोध भावे आणि तेजश्री प्रधान या भूमिकांमध्ये आहेत. दरम्यान तेजश्री प्रधान मालिका सोडणार असल्याची चर्चा अचानक सुरु झाली होती. त्यावर आता तेजश्रीने स्पष्ट उत्तर दिलं आहे.

'राजश्री मराठी'ला दिलेल्या मुलाखतीत तेजश्री प्रधान म्हणाली, "मला माझ्या प्रिय प्रेक्षकांना सांगायचं आहे की आम्ही कलाकार मालिकेव्यतिरिक्त सिनेमे, वेबसीरिजही करतो. कदाचित उद्या मी तुम्हाला एखाद्या नाटकातही दिसेल. पण गेली १५ वर्ष मी एकावेळी सातत्याने तीनही माध्यमांमध्ये काम करत आले आहे. त्यामुळे ही मालिका सुरु असताना जर तुम्हाला एखाद्या नवीन प्रोजेक्टच्या पहिल्या दिवसाची बातमी मिळाली तर गैरसमज करुन घेऊ नका. मी आहे.. शेवटपर्यंत आहे. ही वीण काही तुटायची नाही."

तेजश्री प्रधान लवकरच एका वेबसीरिजमध्ये दिसणार आहे. या सीरिजच्या पहिल्या दिवसाच्या शूटचा फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. या फोटोवरुनच तेजश्रीला नवीन प्रोजेक्ट मिळाल्याने आता ती मालिका सोडतेय ही चर्चा सुरु झाली. याआधी तेजश्रीने स्टार प्रवाहवरील 'प्रेमाची गोष्ट' मालिका अर्ध्यातच सोडली होती. यामुळे तिच्यावर मालिका अर्धवट सोडते असा शिक्काच लावला गेला. पण तेजश्रीने वीण तुटायची नाही म्हणत सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

टॅग्स :तेजश्री प्रधान सुबोध भावे मराठी अभिनेताटेलिव्हिजन