'होणार सून मी या घरची' ही मालिका सर्वांच्या आवडीची. या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं. या मालिकेच्या माध्यमातून तेजश्री प्रधानला अमाप लोकप्रियता मिळाली. तेजश्री प्रधान आणि शशांक केतकर ही नवी जोडी इंडस्ट्रीला मिळाली. आता या मालिकेनंतर तेजश्री प्रधान पुन्हा एकदा झी मराठीवरील नव्या मालिकेत दिसणार आहे. या मालिकेचं नाव 'वीण दोघांतली ही तुटेना'. या मालिकेच्या एका खास इव्हेंटला अनेक वर्षांनी तेजश्रीच्या कानावर 'होणार सून मी या घरची' मालिकेचं नाव कानावर पडलं. तेव्हा अभिनेत्रीने काय प्रतिक्रिया दिली?
'वीण दोघांतली ही तुटेना' मालिकेच्या इव्हेंटला अभिनेता प्रणव रावराणेने सूत्रसंचालनाची जबाबदारी सांभाळली. त्यावेळी प्रणवने तेजश्रीला उद्देशून सांगितलं की, "स्वानंदीबद्दल सांगायचं झालं तर ती ब्रँड बनवते. मग यापूर्वी होणार सून मी या घरची ही मालिका.." असं म्हणताच तेजश्री प्रणवला मध्येच थांबवते आणि म्हणजे "काहीही हाss हे काय तुझं आता". तेजश्री असं म्हणताच सर्वजण हसायला लागतात. 'होणार सून मी या घरची' मालिकेत तेजश्रीचा "काहीही हा श्री" हा संवाद खूप गाजला होता. यानिमित्ताने सर्वांना त्याची आठवण आली.प्रणव तेजश्रीला पुढे म्हणाला, "मी खरं सांगतो. काहीही असं कोणी आपल्याला म्हटलं की पूर्वी वाटायचं की अरे काय आहे, हे काय बोलतायत आपल्याला. पण जेव्हापासून तेजश्रीने काहीही हा श्री असं म्हटलंय तेव्हा काहीही हा शब्द सगळ्या मुलांसाठी इतका जवळचा झालाय की काय सांगू." अशाप्रकारे 'वीण दोघांतली ही तुटेना' मालिकेच्या इव्हेंटला तेजश्रीने पुन्हा एकदा 'होणार सून मी या घरची' मालिकेची आठवण जागवली. त्यामुळे सर्वांच्या चेहऱ्यावर हसू उमटलं.