Join us

दोन दुखावलेल्या मनांची बांधली जाईल का वीण? तेजश्री प्रधानच्या नव्या मालिकेचा प्रोमो समोर, 'या' कलाकारांचं कमबॅक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2025 12:04 IST

तेजश्री प्रधानच्या नव्या मालिकेचा प्रोमो प्रदर्शित, 'हे' कलाकार झळकणार

Vin Doghatli Hi Tutena Serial: गेल्या काही दिवसांपासून मालिकाविश्वात  'वीण दोघांतली ही तुटेना' मालिकेची तुफान चर्चा सुरु आहे. या नव्याकोऱ्या मालिकेच्या माध्यमातून अभिनेता सुबोध भावे आणि तेजश्री प्रधान प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यास सज्ज झाले आहेत. 'वीण दोघांतली ही तुटेना' या मालिकेत समर आणि स्वानंदीच्या भूमिकेत ते पाहायला मिळणार आहेत. हॅगटॅग तदैव लग्नम च्यानंतर हे कलाकार पुन्हा एकत्र पाहायला मिळणार आहेत. येत्या ११ ऑगस्टपासून ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दरम्यान, या मालिकेचा नवा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.  हा प्रोमो पाहून नेटकऱ्यांनी नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. तसंच तेजश्रीच्या कमबॅकबद्दल आनंदही व्यक्त केला आहे. 

'वीण दोघांतली ही तुटेना' मालिका दोन भिन्न व्यक्तींच्या नात्याची गोष्ट आहे, ज्यांचे नाते जबाबदारीतून सुरू होते, ज्याचे रुपांतर प्रेमात होते. या मालिकेच्या प्रोमोतून संपूर्ण स्टारकास्ट देखील समोर आली आहे. तेजश्री प्रधान, सुबोध भावे यांच्यासह मालिकेत सुलभा आर्या, किशोरी अंबिये, भारती पाटील, राज मोरे, पूर्णिमा डे, शर्मिला शिंदे असे कलाकार देखील आहेत. नवरी मिळे हिटलरला मालिका संपताच शर्मिला शिंदे, राज मोरे आणि भारती पाटीलं याचं या नव्या मालिकेतून पुनरागमन झालं आहे.  झी मराठी वाहिनीच्या अधिकृत सोशल मीडियावर अकाउंटवर वीण दोघांतली तुटेना मालिकेचा प्रोमो शेअर करण्यात आला आहे. "दोन दुखावलेल्या मनांची बांधली जाईल का अनोखी वीण? असं कॅप्शन या प्रोमोला देण्यात आलं आहे. 

'वीण दोघांतली ही तुटेना' मालिकेची उत्सुकता शिगेला आहे. ही मालिका ११ ऑगस्टपासून दररोज रात्री ७.३० वाजता झी मराठीवर पाहायला मिळणार आहे. 

टॅग्स :तेजश्री प्रधान सुबोध भावे टेलिव्हिजनसेलिब्रिटीसोशल मीडिया