Join us
Daily Top 2Weekly Top 5

"मी नातं जपण्याचा प्रयत्न केला, पण...",'तारक मेहता...' फेम मुनमुन दत्ताचा ब्रेकअपबद्दल खुलासा, म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2026 10:24 IST

"जर काही गोष्टी पटत नसतील तर…", तारक मेहता...' मधील बबिताचं ब्रेकअपबद्दल मोठं वक्तव्य, काय म्हणाली?

Munmun Dutta: 'तारक मेहता का उल्टा चष्मा' ही छोट्या पडद्यावरील सर्वाधिक गाजलेली मालिका आहे. ही मालिका म्हणजे प्रेक्षकांच्या आवडीचा विषय. या मालिकेप्रमाणे त्यातील प्रत्येक पात्राने प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. तारक मेहता... मधील जेठालाल,चंपकलाल तसेच टप्पूसेना, सोढी, अंजली, बबिता या प्रत्येकाचीच वेगळी तऱ्हा, वेगळं वैशिष्ट्य. इतकी वर्ष आपण या कुटुंबांना बघत आलोय,हसत आलोय. या मालिकेतील बबिता या पात्रातून अभिनेत्री मुनमुन दत्ताने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. सध्या मुनमुन दत्ता एका मुलाखतीमुळे चर्चेत आली आहे. या मुलाखतीत तिने तिच्या खासगी आयुष्याबद्दल अनेक खुलासे केले आहेत.

अलिकडेच मुनमुन दत्ताने 'रणवीर अलाहबादिया'च्या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली. या मुलाखती दरम्यान अभिनेत्रीने तिची लव्हलाईफ तसेच तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलही सांगितलं. या मुलाखतीत मुनमुनने तिचा ब्रेअपबद्दलही प्रतिक्रिया दिली. ती म्हणाली, "मला काही गोष्टी पटल्या नाहीतर मी बाजूला होते. मी  नातं खूप जपण्याचा प्रयत्न करते. पण, कुठेतरी मला असं वाटतं आता मला काहीतरी कोणी द्यावं. जर समोरुन मला तितकंच प्रेम मिळत नसेल तर मी ब्रेकअप करुन बाजुला होते. 

त्यानंतर अभिनेत्री म्हणाली, "मी कायम समोरच्या व्यक्तीचा विचार केला आहे. मी असंच कधी तडकाफडकी त्या व्यक्तीला मेसेज करुन आता आपण ब्रेकअप करुया असं कधीच म्हटलं नाही. जर आमचं नातं २-३ वर्षांचं असेल तर मी त्या नात्याला नक्कीच वेळ दिला आहे. त्यामुळे यातून एक पाऊल मागे येणं मला अजिबात पटत नाही.जर काही गोष्टी पटत नसतील तर मी समोरच्या व्यक्तीचा देखील विचार करते.  नेहमी त्या गोष्टीवर काम करण्याचा प्रयत्न करते.  त्या व्यक्तीला समजावण्याचा प्रयत्न करते."

मुनमुनला पाहिजे 'असा' जोडीदार...

दरम्यान, या मुलाखतीमध्ये अभिनेत्रीने तिच्या होणाऱ्या जोडीदाराकडून काय अपेक्षा आहेत, हे देखील सांगितलं.मुनमुना दिसायला देखणा, हुशार आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेला मुलगा जोडीदार म्हणून पाहिजे. समोरच्या व्यक्ती प्रामाणिक असावा, अशी अपेक्षा देखील तिने बोलून दाखवली. 

English
हिंदी सारांश
Web Title : Munmun Dutta reveals breakup reason: 'I tried to maintain relationship, but...'

Web Summary : Munmun Dutta opened up about her breakups, stating she values relationships but steps back if she doesn't receive equal love. She seeks an honest, handsome, intelligent, and financially stable partner.
टॅग्स :मुनमुन दत्ताटेलिव्हिजनसेलिब्रिटी