Join us
Daily Top 2Weekly Top 5

Confirmed: अखेर प्रतीक्षा संपली, 'तारक मेहता'मध्ये दिशा वकानी नाही तर ही अभिनेत्री दिसणार दयाबेनच्या भूमिकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2022 16:43 IST

Tarak mehta ka ooltah chashmah : गेल्या काही काळापासून दयाबेन या मालिकेपासून दूर होती. मात्र. आता या मालिकेत नव्या दयाबेनची एन्ट्री होणार आहे.

गेल्या १२-१३ वर्षांपासून अविरतपणे प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी लोकप्रिय मालिका म्हणजे 'तारक मेहता का उल्टा चष्मा' (taarak mehta ka ooltah chashmah). ही मालिका अनेक कारणांसाठी खास ठरली. उत्तम कथानक, कलाकारांचा दर्जेदार अभिनय आणि मालिकेची योग्य पद्धतीने केलेली मांडणी यामुळे ही मालिका अल्पावधीत लोकप्रिय झाली. त्यातच मालिकेतील दयाबेन, जेठालाल, भिडे मास्तर, अय्यर, सोढी आणि डॉ. हाथी या काही भूमिका विशेष गाजल्या. या मालिकेतील दयाबेनची लोकप्रियता यत्किंचितही कमी झाली नाही. गेल्या काही काळापासून दयाबेन या मालिकेपासून दूर होती. मात्र. आता या मालिकेत नव्या दयाबेनची एन्ट्री होणार आहे.

आता चाहत्यांची प्रतीक्षा संपणार आहे, कारण आता या शोमध्ये दयाबेनचा ट्रॅक पुन्हा जिवंत होत आहे. आता दिशा नसली तरी 'हम पांच' फेम स्वीटी उर्फ ​​अभिनेत्री राखी विजान दयाबेनची भूमिकी साकारण्यासाठी सज्ज झाली आहे. राखी विजान बऱ्याच दिवसांनी टीव्हीवर पुनरागमन करणार आहे. दिशाच्या भूमिकेत राखीला पाहणे चाहत्यांसाठी खरच ट्रीटपेक्षा कमी नसेल.

मीडिया रिपोर्टनुसार, , "दयाबेनची भूमिका साकारण्यासाठी राखी विजानला संपर्क करण्यात आला आहे. राखी ही सर्वात प्रतिभावान अभिनेत्रींपैकी एक आहे. तिचं कॉमिक टाइमिंग चांगलं आहे."

राखीने याआधी 'हम पांच', 'देख भाई देख', 'बनेगी अपनी बात', 'नागिन 4' सारख्या शोचा भाग केला आहे. त्‍याने 'गोलमाल रिटर्न्‍स' यांसारख्या बॉलिवूड चित्रपटातही काम केले आहे. अभिनेत्री 'बिग बॉस 2' मध्येही सहभागी झाली होती. 

टॅग्स :तारक मेहता का उल्‍टा चश्‍मादिशा वाकानीटिव्ही कलाकार