Join us
Daily Top 2Weekly Top 5

'तारक मेहता'फेम टप्पू सध्या काय करतो माहितीये का? 'या' एका चुकीमुळे उद्धवस्त झालं करिअर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2023 14:04 IST

Bhavya-gandhi: कित्येक वर्ष टप्पू ही भूमिका साकारुन भव्य नावारुपाला आला. मात्र, अचानक त्याने ही मालिका सोडली.

छोट्या पडद्यावर विशेष गाजलेली मालिका म्हणजे 'तारक मेहता का उल्टा चष्मा'. सध्या ही मालिका प्रचंड वादामुळे चर्चेत येत आहे.  अभिनेत्री दिशा वकानीनंतर अनेक कलाकारांनी या मालिकेतून काढता पाय घेतला. त्यातलाच एक अभिनेता म्हणजे भव्य गांधी (bhavya gandhi). कित्येक वर्ष या मालिकेत टप्पू ही भूमिका साकारुन भव्य नावारुपाला आला. मात्र, अचानक त्याने ही मालिका सोडली. त्यामुळे सध्या तो काय करतो? कसा दिसतो असे प्रश्न चाहत्यांना पडतात. म्हणूनच, आज त्याच्याविषयी जाणून घेऊयात.

अलिकडेच भव्यने  एक मुलाखत दिली, या मुलाखतीमध्ये त्याने त्याच्या संघर्षाविषयी भाष्य केलं. "बालकलाकाराला लीड वर्क मिळणं फार कठीण होतं. तसंच टप्पूची भूमिका ही सर्वसाधारण होती. मला काहीच नवीन करता येत नव्हतं. रोज सेटवर जायचं काम करायचं मग पॅकअप करायचं हा दिनक्रम झाला होता. त्यामुळे नवीन काही शिकायला, अनुभवायला मिळत नव्हतं. म्हणूनच, काही तरी वेगळं, नवीन शिकता यावं यासाठी मी हा शो सोडला", असं भव्य म्हणाला.

सध्या काय करतो भव्य?

गाजलेल्या मालिकेतून अचानकपणे बाहेर पडत भव्यने गुजराती सिनेसृष्टीची वाट धरली. सध्या भव्य गुजराती सिनेमांमध्ये काम करत आहे. 'केहवतलाल परिवार' आणि 'तारी साठे' या चित्रपटांमध्ये त्याने काम केलं आहे. तसंच त्याची लोकप्रियता पाहता २०२२ च्या निवडणुकीसाठी त्याला एम्बेसिडर करण्यात आलं होतं. तसंच आयपीएलमध्ये  त्याने मुंबई आणि गुजरात टायटन्सच्या मॅचबद्दल गुजराती कॉमेंट्री केली होती. परंतु, गाजलेला शो सोडल्यानंतर भव्य फारसा कुठेही दिसला नाही. गुजराती इंडस्ट्रीमध्ये देखील त्याने मोजकंच काम केलं आहे. 

टॅग्स :तारक मेहता का उल्‍टा चश्‍मासेलिब्रिटीटेलिव्हिजन