Join us

"विवेक आणि मी लग्न करतोय असं कुणीतरी आईला...", तन्वी मुंडलेने सांगितला 'तो' किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2024 14:04 IST

तन्वीने लोकमत फिल्मीच्या पोटभर गप्पा या खास शोमध्ये हजेरी लावली. या मुलाखतीत तन्वीने तिच्या अभिनयातील करिअर आणि त्याबरोबरच वैयक्तिक आयुष्याबाबतही दिलखुलास गप्पा मारल्या. 

तन्वी मुंडले हा मराठी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय चेहरा आहे. अनेक मालिकांमध्ये तिने काम केलं आहे. 'पाहिले न मी' तुला या मालिकेतून तन्वीला प्रसिद्धी मिळाली. तन्वीची 'भाग्य दिले तू मला' ही मालिका प्रचंड गाजली. या मालिकेत ती मुख्य भूमिकेत होती. नुकतीच तन्वीने लोकमत फिल्मीच्या पोटभर गप्पा या खास शोमध्ये हजेरी लावली. या मुलाखतीत तन्वीने तिच्या अभिनयातील करिअर आणि त्याबरोबरच वैयक्तिक आयुष्याबाबतही दिलखुलास गप्पा मारल्या. 

'भाग्य दिले तू मला' या मालिकेत तन्वीसोबत अभिनेता विवेक सांगळे मुख्य भूमिकेत होता. विवेकबरोबर तन्वीचं नाव जोडलं गेलं होतं आणि ते दोघं लग्न करणार असल्याच्या चर्चा रंगल्याचं अभिनेत्रीने सांगितलं. तन्वी एक किस्सा सांगत म्हणाली, "एकदा कुणीतरी माझ्या घरी जाऊन आईला सांगितलं की तुमची मुलगी विवेक सांगळेसोबत लग्न करतेय. आई त्यांना म्हणाली की असं काही नाहीये. ती आम्हाला सांगितल्याशिवाय लग्न करणार नाही. आईने मला नंतर हा किस्सा सांगितला. तेव्हा मी आईला म्हटलं की तू त्यांना विचारायचं ना पत्रिका दाखवा". 

"तेव्हा मालिकेत आमचं लग्न ठरलं होतं. आणि तेव्हा आम्ही रील्स बनवायचो. ते रील्स व्हायरल झाले होते. तेव्हा आम्ही दोघं लग्न करतोय का अशा चर्चा होत्या. पण, जेव्हा करायचं असेल तेव्हा मी बिनधास्त सांगेन की मी डेट करतेय आणि लग्न करणार आहे. असं लपूनछपून नक्कीच करणार नाही", असंही पुढे तन्वीने सांगितलं. 

टॅग्स :टिव्ही कलाकारसेलिब्रिटी