Join us
Daily Top 2Weekly Top 5

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2026 13:08 IST

अभिनेत्रीच्या निधनाने मनोरंजनसृष्टीवर शोककळा

मनोरंजनविश्वातून धक्कादायक बातमी आली आहे. तमिळ टीव्ही अभिनेत्री सुभाषिनीने राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. 'कयल' या मालिकेमुळे ती लोकप्रिय झाली होती. तिने अशा प्रकारे टोकाचं पाऊल उचलल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. आत्महत्या करण्याआधी तिचा पतीसोबत वाद झाला होता अशी चर्चा आहे, सध्या पोलिस घटनेचा तपास करत आहेत. 

सुभाषिनी ही चेन्नईमध्ये अय्यप्पनथंगल येथील एका अपार्टमेंटमध्ये राहत होती. आधी ती बंगळुरुमध्ये पती पिप्पिनसोबत राहायची. मात्र शूटिंगसाठी ती चेन्नईतील पोरुर येथे राहत होती. सुभाषिनी सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह होती. रात्रीच तिचा पतीसोबत व्हिडीओ कॉल झाला होता. यावेळी त्यांच्यात कौटुंबिक कारणावरुन वाद झाला. यामुळे सुभाषिनी मानसिक तणावाखाली आली आणि तिने टोकाचं पाऊल उचललं. पोलिसांना सूचना मिळताच ते घटनास्थळी पोहोचले. सुभाषिनीचं पार्थिव शवगृहात नेण्यात आलं. आता पोलिस अधिक तपास करत आहेत. 

सुभाषिनीने पी. सेल्वम यांच्या 'कयल' या लोकप्रिय मालिकेत काम केलं होतं. यामध्ये तिच्यासोबत सैत्रा रेड्डी आणि संजीव कार्तिक यांची मुख्य भूमिका होती. तसंच तिने याआधी अनेक टीव्ही शो आणि इव्हेंट्समध्ये सूत्रसंचालन केलं. सुभाषिनी मूळची श्रीलंकेची आहे. तिने कोलंबो युनिव्हर्सिटीतून व्हिज्युअल अँड परफॉर्मिंग आर्ट्समध्ये शिक्षण घेतलं. सध्या बंगळुरुत वास्तव्यास होती. 

English
हिंदी सारांश
Web Title : Popular TV actress commits suicide after fight with husband.

Web Summary : Tamil TV actress Subhashini, known for 'Kayal,' tragically ended her life. A dispute with her husband preceded the suicide. Police are investigating the incident at her Chennai apartment. She was originally from Sri Lanka.
टॅग्स :सेलिब्रिटीमृत्यूचेन्नई