Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘द व्हॉइस’मध्ये तब्बू आणि रकुलप्रीत सिंहने केला धमाकेदार डान्स !

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2019 19:00 IST

या कार्यक्रमाची अंतिम फेरी येत्या वीकेण्डला होत असून त्यातील चुरस अगदी अटीतटीला पोहोचली आहे. प्रत्येक स्पर्धक आपली सर्वोत्कृष्ट कामगिरी करून हे मानाचे विजेतेपद प्राप्त करण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहे.

अदनान सामी, कनिका कपूर, हर्षदीप कौर आणि अरमान मलिक यांच्यासारखे प्रशिक्षक यामुळे ‘स्टार प्लस’वरील ‘द व्हॉइस’ या गाण्यांच्या रिअ‍ॅलिटी कार्यक्रमाने सुरुवातीपासूनच प्रेक्षकांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले आहे. या कार्यक्रमाची अंतिम फेरी आता सुरू होणार असल्याने विजेत्याबद्दलची उत्कंठा गगनाला भिडली आहे. आता या अंतिम फेरीत अभिनेत्री तब्बू आणि रकुलप्रीत सिंह सहभागी होणार असल्याने उत्साहात भरच पडली आहे.

या दोन अभिनेत्रींनी या कार्यक्रमात सहभागी होऊन खूपच धमाल केली आणि प्रत्येक स्पर्धकाची गाणी मन लावून ऐकली. या दोघी भूमिका साकारीत असलेल्या ‘दे दे प्यार दे’  या आगामी चित्रपटातील एक गाणे गाऊन प्रशिक्षक अरमान मलिकने या दोघींवर आपली छाप टाकण्याचा प्रयत्न केला. या दोघीही उत्साही आणि खिलाडू वृत्तीच्या असल्याने त्यांनी सर्व स्पर्धकांबरोबर नृत्यही केले. संपूर्ण स्पर्धेत त्यांनी प्रत्येक स्पर्धकाला प्रोत्सहन दिले. त्यांच्यावर प्रेक्षकही खुश होते.

या कार्यक्रमाची अंतिम फेरी येत्या वीकेण्डला होत असून त्यातील चुरस अगदी अटीतटीला पोहोचली आहे. प्रत्येक स्पर्धक आपली सर्वोत्कृष्ट कामगिरी करून हे मानाचे विजेतेपद प्राप्त करण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहे. मात्र या अंतिम फेरीची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यात सेलिब्रिटी अतिथी म्हणून आशा भोसले सहभागी होणार आहेत,  यावेळी आपले अनुभव आणि मौलिक सल्ले सर्व स्पर्धक आणि प्रशिक्षकांना देतील. 

टॅग्स :द व्हॉइस शोरकुल प्रीत सिंग