Join us
Daily Top 2Weekly Top 5

'तारक मेहता का उल्‍टा चश्‍मा'वर भडकले चाहते; होतेय बॉयकॉटची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2023 17:05 IST

'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेवर चाहते चांगलेच संतापले असून बॉयकॉटची मागणी करत आहेत. 

घराघरांत पाहिली जाणारी 'तारक मेहता का उल्टा चष्मा' ही मालिका गेल्या दशकभरापासून लोकांचं मनोरंजन करंत आहे. छोट्या मुलांपासून वयोवृद्ध व्यक्तींच्या पसंतीमुळं ही मालिका टीआरपीच्या यादीत सुद्धा टॉप आहे. केवळ हिंदी भाषिक नव्हे तर इतर भाषिकही ही मालिका आवडीनं पाहतात. मात्र, सध्या या मालिकेवर चाहते चांगलेच संतापले असून बॉयकॉटची मागणी करत आहेत. 

मालिकेत दयाबेनची एन्ट्री होणार असल्याचे म्हटले जात होते. तसा एक प्रोमोही शेअर करण्यात आला होता. पण, लेटेस्ट एपिसोडमध्ये दिसते की,  जेठालाल दयाबेन परतत असल्याची बातमी टप्पूला देताना दिसतात. सुंदरने जेठालालला वचन दिले आहे की तो दयाला परत आणेल. त्यामुळे संपूर्ण गोकुळधाम सोसायटी व गडा परिवाराने दया यांना परत आणण्याची तयारी सुरू केली. संपुर्ण गोकुळधाम सजवले जाते. 

जेठालाल दयाच्या येण्याचा आनंद साजरा करण्यासाठी सोसायटीच्या आवारात तिची वाट पाहत असतो. तर दुसरीकडे आई परतणार म्हणुन टप्पू देखील फटाके फोडतो. पण, जेव्हा जेठालाल गाडीचा दरवाजा उघडतो. पण, सुंदर आणि दयाबेन गाडीतून उतरत नाही. दयाबेन न आल्याने  गोकुळधाममधील लोक नाराज होतात. 

दयाबेन मालिकेत न परतल्याने चाहते निर्मात्यांवर संतापले आहेत. आता सोशल मिडियावर त्यांनी शोला बॉयकॉट करण्याची मागणी केली आहे. एकाने लिहले की, 'हा शो निर्मात्यांनी खराब केला आहे. दयाबेन परतली असं सांगून लोकांना वेड्यात काढले जाते.  पैसा आणि टीआरपीसाठी ते प्रेक्षकांच्या भावनांशी खेळतात.  दिशा वकानीने दयाबेन, जेठालाल म्हणजेच दिलीप जोशी यांच्या पत्नीची भूमिका साकारली होती. मात्र २०१७  पासून ती या शोपासून दूर आहे. पण ती पुनरागमन करेल अशी आशा चाहत्यांना आहे. 

टॅग्स :तारक मेहता का उल्‍टा चश्‍मादिशा वाकानीटिव्ही कलाकार