Join us

अखेर 'तारक मेहता'ला मिळाले नवीन नट्टू काका; निर्मात्यांनी शेअर केला फर्स्ट लूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2022 17:19 IST

Nattu kaka:अभिनेता घनश्यान नायक यांनी नट्टू काकांची भूमिका साकारली होती. मात्र, त्यांच्या निधनानंतर या मालिकेत ही भूमिका कोण साकारणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष वेधलं होतं.

गेल्या १३ ते १४ वर्षांपासून अविरतपणे प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी मालिका म्हणजे 'तारक मेहता का उल्टा चश्मा' (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah). या मालिकेतील प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांना आपलंसं केलं. यात अनेक कलाकार मालिका सोडून गेले तर काही कलाकार नव्याने या मालिकेसोबत जोडले गेले. परंतु, प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांच्या मनावर त्यांची छाप सोडली. त्यातलंच एक नाव म्हणजे नट्टू काका(Nattu Kaka) . अभिनेता घनश्यान नायक यांनी नट्टू काकांची भूमिका साकारली होती. मात्र, त्यांच्या निधनानंतर या मालिकेत ही भूमिका कोण साकारणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष वेधलं होतं. विशेष म्हणजे आता या मालिकेला नवे नट्टू काका भेटले आहेत.

घनश्याम नायक यांच्या निधनामुळे या मालिकेत येणाऱ्या नव्या नट्टू काकांविषयी बरीच चर्चा रंगली होती. अनेक जणांची नावं या भूमिकेसाठी घेण्यात आली होती. मात्र, आता मालिकेचे निर्माते असित मोदी (Asit Modi)  यांनी प्रेक्षकांना नव्या नट्टू काकांची भेट घडवून दिली आहे.

'तारक मेहता'च्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर असित मोदी यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी प्रेक्षकांना नव्या नट्टू काकांची ओळख करुन दिली असून आजपासून ते प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं सांगितलं आहे.

दरम्यान, या फोटोमध्ये असित मोदींसह नवीन नट्टू काका दिसत असले तरीदेखील त्यांचं नाव मात्र, गुलदस्त्यात आहे. या मालिकेत नट्टू काका आणि बागा याची जोडी विशेष गाजली होती. घनश्याम नायक यांनी या भूमिकेला खऱ्या अर्थाने न्याय दिला होता. त्यामुळे आता नवे नट्टू काका प्रेक्षकांच्या पसंतीत पडतात की नाही हे येत्या काळातच कळणार आहे. 

टॅग्स :तारक मेहता का उल्‍टा चश्‍मासेलिब्रिटीटेलिव्हिजन