'तारक मेहता का उल्टा चष्मा' या लोकप्रिय मालिकेतील अभिनेते भीम वकानी (bhim vakani) यांचं निधन झालं आहे. भीम वकानी हे मालिकेतील 'दयाबेन'ची भूमिका साकारणारी अभिनेत्री दिशा वकानीचे वडील होते. वडिलांचं निधन झाल्याने दिशाच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दिशा वकानीचे वडील भीम वकानी (Bhim Vakani) यांचे निधन झाले असून, मालिकेचे निर्माते असित कुमार मोदी यांनी ही बातमी सर्वांना सांगितली.असित मोदींनी भीम यांच्याविषयी भावना व्यक्त करताना सांगितलं की, ''त्यांची तब्येत काही दिवसांपासून ठीक नव्हती. आज सकाळी त्यांचं निधन झालं. भीम वकानी उत्कृष्ट अभिनेते, चित्रकार आणि दिग्दर्शकही होते. त्यांनी लगान सिनेमातही काम केलं. त्यांची लेक दिशाने दयाबेनच्या भूमिकेतून जे यश मिळवलं याबद्दल त्यांना आनंद होता. दिशाचं करिअर घडवण्यात त्यांचं खूप योगदान होतं. आमचं कुटुंबासारखं नातं होतं. जेव्हा ते मुंबईत यायचे तेव्हा माझ्या घरी येऊन आम्ही फिरायला जायचो. माझ्या कुटुंबातील सदस्य गेल्याची भावना मनात आहे.''
या बातमीने 'तारक मेहता...'च्या चाहत्यांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. सोशल मीडियावर चाहते दिशा आणि तिच्या कुटुंबाप्रती संवेदना व्यक्त करत आहेत. दिशा वकानी सध्या अभिनय क्षेत्रापासून दूर असून आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवत आहे, अशा कठीण काळात चाहते तिला धीर देत आहेत.
Web Summary : Bhim Vakani, actor from 'Taarak Mehta,' and father of Disha Vakani (Dayaben), passed away. He was also an actor & director who appeared in 'Lagaan' and 'Taarak Mehta'. The industry mourns his loss.
Web Summary : 'तारक मेहता' के अभिनेता और दिशा वकानी (दयाबेन) के पिता भीम वकानी का निधन हो गया। वह 'लगान' और 'तारक मेहता' में भी दिखे थे। उद्योग में शोक की लहर।