T20 World Cup : रविवारी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर टी २० वर्ल्डकपच्या फायनलचा थरार रंगला. भारताने न्यूझीलंडचा ९६ मतांनी पराभव करत सलग दुसऱ्यांदा टी २० वर्ल्डकपचं विजेतेपद मिळवलं. जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवर रंगलेल्या फानयलमध्ये चॅम्पियन भारतीय संघाने विक्रमी तिसऱ्यांदा टी-२० वर्ल्ड कप ट्रॉफी उंचावण्याचं स्वप्न साकार केले. टी-२० वर्ल्ड कपच्या आतापर्यंतच्या इतिहासात कोणत्याही संघाला सलग दोन वेळा ही स्पर्धा जिंकता आली नव्हती. एवढेच नाही तर यजमानपद भुषवताना ट्रॉफी जिंकणारी टीम इंडिया पहिली टीम ठरली आहे.
'बिग बॉस मराठी' फेम आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर असलेला करण सोनावणेही हा वर्ल्डकप फायनलचा थरार पाहण्यासाठी गेला होता. वर्ल्डकप जिंकल्यानंतर करण सोनावणेने भारतीय संघाचा कॅप्टन सूर्यकुमार यादवसोबत भन्नाट रील बनवला आहे. करणने त्याच्या अकाऊंटवरुन हा रील व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये करण आणि सूर्यकुमार यादव झिंगाट गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करत करण सोनावणेने मजेशीर कॅप्शन दिलं आहे. "आली रे आली ट्रॉफी आली...", असं कॅप्शन त्याने दिलं आहे. तर "यासाठी बिग बॉस सोडणं योग्य होतं", असंही त्याने कमेंटमध्ये म्हटलं आहे.
करणने त्याच्या इन्स्टाग्रामवरुन शेअर केलेल्या या व्हिडीओवर अनेकांनी कमेंटही केल्या आहेत. सूर्यकुमार यादवला त्याने या रीलमध्ये टॅग केलं आहे. दरम्यान, करण हा बिग बॉस मराठीच्या घरात सहभागी झाला होता. त्याने पहिल्या दिवसापासून मास्टरमाइंड गेम खेळायला सुरुवात केली होती. मात्र नंतर त्याचा गेम कुठेतरी मागे पडल्याचं जाणवलं. त्यानंतर त्याने घरातून एक्झिट घेतली होती.
Web Summary : India won the T20 World Cup, defeating New Zealand. 'Bigg Boss' fame Karan Sonawane celebrated with Indian captain Suryakumar Yadav, creating a dance reel to the song 'Zingaat' and sharing it on Instagram.
Web Summary : भारत ने न्यूजीलैंड को हराकर टी20 वर्ल्ड कप जीता। 'बिग बॉस' फेम करण सोनावणे ने भारतीय कप्तान सूर्यकुमार यादव के साथ 'झिंगाट' गाने पर डांस करते हुए इंस्टाग्राम पर एक रील शेयर की।