Join us
Daily Top 2Weekly Top 5

"मला उपदेशाचे डोस पाजतील की तू...", स्वामिनी फेम अभिनेत्रीची पोस्ट आली चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2023 12:39 IST

'स्वामिनी' मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे सुरभी भावे. अनेक मालिकांमध्ये काम करुन अभिनयाचा ठसा उमटवलेल्या सुरभीचा चाहता वर्गही मोठा आहे.

'स्वामिनी' मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे सुरभी भावे. अनेक मालिकांमध्ये काम करुन अभिनयाचा ठसा उमटवलेल्या सुरभीचा चाहता वर्गही मोठा आहे. सुरभी सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. नवीन प्रोजेक्टबद्दल सोशल मीडियावर पोस्ट करुन ती चाहत्यांना माहिती देत असते. दिवाळीनिमित्त सुरभीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे जी चर्चेत आली आहे. 

सुरभी लिहिते, दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा !! ह्या निमित्ताने एक आवाहन हवेत आधीच खूप प्रदूषण आहे त्यात फटाके वाजवून भर टाकण्या पेक्षा एकमेकांच्या घरी जाऊन भेटू शकतो किंवा उत्तम वाचन ,उत्तम सिनेमा ,उत्तम नाटक असे सर्व पाहून दिवाळी साजरी करू शकतो ... P.S आता जे मला उपदेशाचे डोस पाजतील की तू पण फटाके वाजवतच असशील वगैरे तर त्यांचा साठीमी 4थी मध्ये असताना कारगिल युद्ध झालेल त्यावेळी मी फटाके न घेता गावात पैसे गोळा करून ते सैनिकांना दिलेले तेव्हापासून मी जे फटाके वाजवणं बंद केलं ते आजतागायत मी फुलबाजी पण लावलेली नाही. 

दरम्यान सुरभी सध्या 'राणी मी होणार' या मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारत आहे. याबरोबरच सुरभी 'भाग्य दिले तू मला', '३६ गुणी जोडी' या मालिकेतही झळकली आहे. 

टॅग्स :टिव्ही कलाकार