Join us
Daily Top 2Weekly Top 5

भारीच...! ज्यांनी मला घडवलं त्यांच्यासाठी... मराठमोळ्या अभिनेत्याने आई- वडिलांना भेट दिली कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2023 13:26 IST

छोट्या पडद्यावरील या प्रसिद्ध अभिनेत्याचे नेटकरी कौतुक करताना थकत नाहीत.

मराठी टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेता अक्षर कोठारी(Akshar Kothari)ने आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर रसिकांच्या मनात घर केले आहे. बऱ्याच मोठ्या कालावधीनंतर अक्षरला स्वाभिमान (Swabhiman) मालिकेतून हवी तशी भूमिका साकारण्याची संधी मिळाली. बंध रेशमाचे या मालिकेतून अक्षरने मराठी मालिका क्षेत्रात पाऊल टाकले होते. आराधना, छोटी मालकीण, चाहूल २ अशा मालिकेत तो पाहायला मिळाला. अक्षर 'स्वाभिमान' मालिकेत शंतनू सूर्यवंशी भूमिका साकारत होता. 

 'स्वाभिमान' मालिकेमुळे तो पुन्हा चाहत्यांचा लाडका झाला. शंतनू आणि पल्लवी यांची जोडीही प्रेक्षकांना प्रचंड आवडायची. काही महिन्यांपूर्वीच या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. आता अक्षरने आई- वडिलांना गाडी भेट दिली आहे. सोशल मीडियावर त्याने एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात अभिनेता त्याच्या गाडीचं स्वागत करताना दिसतोय. अक्षचे वडील गाडी चालवताना दिसतायेत तर लेकानं गाडी घेतल्याचं आनंद आईच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसतोय. 

हा व्हिडीओ शेअर करताना अक्षयने लिहिले, 'नेहमी आनंद शोधूनच सापडतो असं नाही तर तो शोधण्यातही एक आनंद असतो. ज्यांनी मला घडवलं.. त्यांच्यासाठी.. छोटीशी भेट..' अक्षयचा हा व्हिडीओ पाहून सेलिब्रेटींसह नेटकरी त्याचे कौतुक करताना थकत नाहीत. खूप छान भेट दिली तू, अप्रतिम..मुलगा असावा तर असा' अशा शब्दांत चाहत्यांनी त्यांचं कौतुक केलं आहे. 

टॅग्स :टिव्ही कलाकार