महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेता गौरव मोरेने एकाच वेळी चाहत्यांना दोन गुडन्यूज दिल्या आहेत. गौरवने प्रियांका कारेकरशी गुपचूप लग्न करत त्याच्या पवईतील नव्या घरात गृहप्रवेशही केला. नवीन घराच्या वास्तूशांती पूजेला त्याने सेलिब्रिटींसह नेतेमंडळींनाही आमंत्रण दिलं होतं. शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेही गौरव मोरेला शुभेच्छा देण्यासाठी त्याच्या घरी पोहोचल्या. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांनी गौरव मोरेला शुभेच्छा दिल्या आहेत.
सुषमा अंधारे पोस्टमध्ये म्हणतात, "गौरव मोरे हा माझ्या लेकीचा हास्यजत्रेतील सगळ्यात आवडता कलाकार. वाढदिवसाचे गिफ्ट काय हवंय म्हटलं तर मला गौरव मामाला भेटायचंय...दोघांच्याही कामाच्या वेळा इतक्या घाई गडबडीच्या, त्यात लेकीच्या शाळेचं वेळापत्रक...पण काल गृहप्रवेशाच्या निमित्ताने भेट झालीच. अमिताभ बच्चनचा एक गाजलेला डायलॉग आहे.. इंसान चाहे जितनी बुलंदी या छुले पर अपनी औकात नही भूलने का...बोले तो अपने वजुद को खोने का नहीं! वजुद... अस्तित्व... अस्मिता... ओळख... आपलं मूळ आपण जिथून सुरुवात केली".
"इंग्रजीत एक अतिशय चांगली म्हण आहे. One, who knows their roots they can get the fruits अर्थात ज्यांना स्वतःची मुळे माहीत असतात त्यांनाच भविष्यातली फळ मिळत असतात. मुळं जितकी घट्ट खोलवर रुजतात झाड तितकं अधिक बहरत जातं. मूळ घट्ट रुजणं म्हणजे काय हे आज गौरवचं घर बघितल्यानंतर अधिक प्रकर्षाने जाणवलं. घर म्हणजे नुसत्या चार भिंती नाही. तर मानसिक स्थैर्याची जागा. आम्हा मध्यमवर्गीय माणसांच्यासाठी तो बंगला आहे की वनरूम किचन यापेक्षा ते स्वतःचं हक्काचं घर आहे. जे स्वतःच्या निढळाच्या घामाने उभे केले आहे", असं त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.
"पवई मधला सुंदर टू बीएचके.... अफलातून इंटिरियर.... ज्यांच्यामुळे आपण उभे आहोत त्यांचं दर्शनी भागातलं अधिष्ठान... प्रवेशद्वारावर आपण जिथून आलोय तिथली खूण सांगणारी "फिल्टरपाड्याचा बच्चन" ही अतिशय गोड आणि हटके पाटी... घरभर कार्पोरेट जगतातली नाही तर आयुष्यभर सुखदुःखामध्ये उभी राहिलेली अतिशय जिवाभावाची माणसं आणि त्यांच्या प्रेम आणि कौतुकाने आनंदून गेलेला गौरव अन् आपल्या लेकाचं कर्तृत्व आणि कौतुक न्याहाळत तृप्त झालेली आई. मजा आली... कुठलीही पार्श्वभूमी नसताना एक मराठी कलाकार निव्वळ आपल्या मेहनतीने स्वतःची ओळख निर्माण करतो तेव्हा भारी तर वाटणारच....गौरव, भय्यू तुला खूप खूप शुभेच्छा.. वास्तू फलद्रुप होवो", असं म्हणत त्यांनी गौरवचं कौतुक केलं आहे.
Web Summary : Sushma Andhare visited actor Gaurav More's new home, celebrating his success and humble roots. She admired his beautiful house, the 'Filterpadyacha Bachchan' sign, and the genuine people surrounding him, wishing him all the best.
Web Summary : सुषमा अंधारे ने अभिनेता गौरव मोरे के नए घर का दौरा किया, उनकी सफलता और विनम्र जड़ों का जश्न मनाया। उन्होंने उनके सुंदर घर, 'फिल्टरपाड्याचा बच्चन' चिन्ह और उनके आसपास के वास्तविक लोगों की प्रशंसा की, और उन्हें शुभकामनाएं दीं।