Join us
Daily Top 2Weekly Top 5

'एक घर मंतरलेलं'मध्ये सुरुची साकारणार 'ही' भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2019 20:00 IST

'का रे दुरावा' या मालिकेमुळे सुरुची अडारकर हे नाव घराघरात पोहोचले. झी युवा वाहिनीवरील नवीन मालिका 'एक घर मंतरलेलं'मध्ये सुरुची पत्रकाराची भूमिका साकारणार आहे.

ठळक मुद्दे'एक घर मंतरलेलं'मध्ये सुरुची पत्रकाराची भूमिका साकारणार आहे

'का रे दुरावा' या मालिकेमुळे सुरुची अडारकर हे नाव घराघरात पोहोचले. झी युवा वाहिनीवरील नवीन मालिका 'एक घर मंतरलेलं'मध्ये सुरुची पत्रकाराची भूमिका साकारणार आहे.

घराची ओढ प्रत्येकालाच असते, पण असंही एक घर असतं जे तुम्हालाचं ओढून घेतं...असंच किंवा याहून काहीतरी अनपेक्षित गूढ आणि रहस्यमय अशी नवीन मालिका 'एक घर मंतरलेलं' ४ मार्चपासून सोमवार ते शनिवार रोज रात्री ९:३० वाजता झी युवा वाहिनीवरून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 

या मालिकेबद्दल सुरुचीला विचारले असता ती म्हणाली, 'झी युवावरील अंजली या मालिकेनंतर खरं तर मला थोडा ब्रेक हवा होता. पण जेव्हा ही स्क्रिप्ट मला सांगण्यात आली तेव्हा मात्र मी विचार बदलला. एवढा चांगला रोल कोणताही कलाकार त्याच्या हातून निसटू देणार नाही. यात मी एक आजच्या काळातील एक निर्भीड पत्रकार साकारत आहे. बऱ्यादा आपल्याला जे दिसत त्यावर आपला विश्वास बसतो पण त्याच्या मागचे सत्य जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करत नाही आणि हेच मी दाखून देणार आहे आणि त्या मागचा सत्य शोधण्याचा प्रयत्न करणार आहे. एक घर मंतरलेलं या मालिकेतील गार्गी महाजन हे पत्रकारांचं पात्र हे मी आजवर केलेल्या इतर पात्रांपेक्षा नक्कीच वेगळं आणि आव्हानात्मक आहे. आजवर मी सादर केलेल्या भूमिकांप्रमाणे , ही भूमिका देखील प्रेक्षकांना आवडेल अशी मी आशा करते.''

टॅग्स :झी युवाटिव्ही कलाकार