Join us
Daily Top 2Weekly Top 5

अभिषेक कुमारसोबत धक्काबुक्की पडली महागात; हा स्पर्धक बिग बॉसच्या घरातून पडला बाहेर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2023 18:41 IST

बिग बॉसच्या घरातून एक स्पर्धक बेघर झाला आहे.

बिग बॉस’च्या 17 व्या पर्वातील स्पर्धकांची सध्या चांगलीच चर्चा सुरू आहे. दररोज या स्पर्धकांचे व्हिडीओ, त्यांनी केलेली बिग बॉसच्या घरातील वक्तव्य चर्चेत असतात. अशातच बिग बॉसच्या घरातून एक स्पर्धक बेघर झाला आहे. अभिषेकसोबत वाद घातल्याने सनी अर्थात 'तेहलका'ला 'बिग बॉस'च्या घरातून बाहेर काढण्यात आलं आहे.

सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तेहलका अभिषेकचं टी-शर्ट खेचताना दिसत आहे. अनेकदा चेतावनी देऊनही तेहलकाने 'बिग बॉस'च्या नियमांचं उल्लंघन केलं आहे. अखेर घरातील हिंसक वळणामुळे त्याला शोमधून बाहेर काढण्यात आले आहे. बिग बॉसच्या घरात इतर स्पर्धकांवर हात उगारणे किंवा हिंसाचाराचा वापर करण्यावर पूर्ण बंदी आहे.

सलमान खानच्या अनुपस्थितीत करण जोहर बिग बॉस 17 च्या 'वीकेंड का वार' होस्ट करत आहे. बद्दलचा एक प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या प्रोमोमध्ये करण जोहर तहलकाला शिक्षा देत या बिग बॉसच्या घरातून बाहेर येण्यास सांगत आहे.याआधीही करण जोहरने सलमानच्या जागी 'वीकेंड का वार' ळा होस्ट केला होता. 

टॅग्स :बिग बॉसटिव्ही कलाकारसेलिब्रिटी