Join us
Daily Top 2Weekly Top 5

'सुंदरा मनामध्ये भरली'मधील लतिका उर्फ अक्षयाची सख्खी बहीण देखील आहे अभिनेत्री, जाणून घ्या तिच्याबद्दल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2021 07:00 IST

अक्षया नाईकने लतिकाच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविते आहे. तिची बहिणदेखील अभिनेत्री आहे.

१९९८ साली निशिगंधा वाड आणि दिवंगत अभिनेते रमेश भाटकर यांची मुख्य भूमिका असलेला मराठी चित्रपट अशी ज्ञानेश्वरी त्यावेळी खूपच गाजला होता.  या चित्रपट निशिगंधा वाड आणि रमेश भाटकर यांच्याशिवाय कुलदीप पवार, सुहास पळशीकर, सयाजी शिंदे, नंदू माधव यांच्या देखील महत्वाच्या भूमिका होत्या.

या चित्रपटात चिमुरड्या ज्ञानेश्वरीमुळे त्यांचे आयुष्य कसे बदलते हे या चित्रपटात दाखवले गेले होते. या चित्रपटात चिमुरडी ज्ञानेश्वरीची भूमिका साकारली होती अक्षता नाईक हिने. अक्षता नाईक ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका सुंदरा मनामध्ये भरलीमध्ये लतिकाची भूमिका साकारणारी अभिनेत्री अक्षया नाईक हिची सख्खी बहिण आहे. 

अक्षता नाईक ही अशी ज्ञानेश्वरी या चित्रपटाचे निर्माते अरविंद नाईक यांची  कन्या आहे. अक्षता प्रॉडक्शन्स या त्यांच्या निर्मिती संस्थेतूनच अशी ज्ञानेश्वरी चित्रपट बनवण्यात आला होता. अक्षता आणि अक्षया या त्यांच्या दोन मुली आहेत.

या चित्रपटानंतर अक्षता फारशी कुठल्याच चित्रपटात दिसली नसली तरी तिची धाकटी बहीण अक्षया नाईक कलर्स मराठीवरील सुंदरा मनामध्ये भरली या लोकप्रिय मालिकेत लतिकाच्या मुख्य भूमिकेत झळकताना दिसत आहे.

अक्षयाला लहानपणापासूनच अभिनय आणि डान्सची आवड होती. अक्षयाने सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेपूर्वी ये रिश्ते है प्यार के, ये रिश्ता क्या कहलाता है यांसारख्या हिन्दी मालिकांमध्ये देखील काम केले आहे.

मराठीमधील ही तिची पहिलीच मालिका आहे. याशिवाय अक्षयाने फिट इंडिया या चित्रपटात देखील काम केले आहे. अक्षतापेक्षा तिची धाकटी बहीण अक्षयाने अभिनय क्षेत्रात आता चांगलाच जम बसवलेला पाहायला मिळतो आहे.

अक्षताचे आता लग्न झाले असून सध्या ती तिच्या कुटुंबासोबत मुंबईतच स्थायिक आहे. अक्षयाप्रमाणेच अक्षताला देखील डान्सची विशेष आवड आहे. या दोघींचे डान्सचे व्हिडीओ अक्षया सोशल मीडियावर नेहमीच शेअर करताना दिसते.

तब्बल २२ वर्षानंतर दिसलेल्या या अक्षताला फार कमी लोकांनी ओळखली असावी. अक्षता अभिनयापासून लांब असली तरी मराठी चित्रपटातील बालकलाकार म्हणून ती कायम प्रेक्षकांच्या लक्षात राहेल.

टॅग्स :अक्षया नाईक