Join us
Daily Top 2Weekly Top 5

'मासिक पाळी आल्यावर काय करायचं हे वडिलांनी सांगितलं'; सुंबुल तौकीरचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2023 10:41 IST

Sumbul touqeer: 'त्या काळात आमचं मार्गदर्शन करेल असं कोणी नव्हतं', असं म्हणत सुंबुलने तिच्या वडिलांविषयी भाष्य केलं.

मासिक पाळीविषयी आजही अनेक समज-गैरसमज समाजात असल्याचं पाहायला मिळतं. इतकंच नाही तर याविषयावर स्वत: महिलादेखील उघडपणे बोलायला काचरतात. त्यातही जर एखाद्या पुरुषाने याविषयीचा उल्लेख केला तर अनेक जण भुवया उंचावतात. परंतु, छोट्या पडद्यावरील एका लोकप्रिय अभिनेत्रीला तिच्या वडिलांनीच मासिक पाळीविषयी जागृत केलं होतं. याविषयी तिने एका मुलाखतीत सांगितलं आहे.

'इमली' या गाजलेल्या मालिकेतून नावारुपाला आलेली अभिनेत्री म्हणजे सुंबुल तौकीर (sumbul touqeer) . 'बिग बॉस १६' या शोमुळे ती खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आली. १९ वर्षाच्या सुंबुलने अलिकडेच ई टाइम्सला दिलेल्या मुलाखतीमध्ये तिच्या मासिक पाळीविषयीचा अनुभव शेअर केला. यात माझ्या वडिलांनीच प्रथम मला या गोष्टीची माहिती दिली असं तिने सांगितलं.

"मी स्वत:ला फार भाग्यवान समजते. कारण, माझे वडील फार समजूतदार आहे. मी ६ वर्षांची होते तेव्हापासून ते माझा सांभाळ करतायेत. त्यांनी एकट्याने आम्हा भावंडांना लहानाचं मोठं केलं. ते सारं काही करायचे अगदी आम्हाला सकाळी झोपेतून उठवण्यापासून ते शाळेत जायची तयारी करेपर्यंत. आमचं करुन, घर चालवायचे, स्वत:चं डान्स स्कूल चालवायचे", असं सुंबुल म्हणाली.

पुढे ती म्हणाले,  "आम्ही मोठं होत असताना त्यांच्या समोर अनेक आव्हानं होती, पण त्यांनी ती स्वीकारली. मुली कळत्या वयात येत असताना त्यांच्यातील शारीरिक बदल त्यांना आम्हाला समजावून सांगायचे होते. हे मोठं आव्हान त्यांनी स्वीकारलं. मला पहिल्यांदा माझ्या वडिलांनीच मासिक पाळीविषयी सांगितलं. मासिक पाळी आल्यावर काय करायलं हवं, त्या दिवसात कसं रहायचं हे त्यांनी मला सांगितलं."

''वडिलांविषयी तिने अजून बऱ्याच गोष्टी सांगितल्या. मला मासिक पाळी आली त्यावेळी मला सावरायला, मार्गदर्शन करायला इतर कोणी नव्हतं. ते काम माझ्या वडिलांनी केलं. माझे वडील माझ्यासाठी सर्व काही आहेत. त्यामुळे माझ्या आयुष्याबद्दल त्यांना सगळं माहितीये.''

दरम्यान, १९ वर्षाच्या सुंबुलने बिग बॉसच्या १६व्या सीझनमध्ये प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतलं होतं. ती या शोमधील सर्वात कमी वयाची सदस्य होती. बिग बॉसच्या घरात असताना सुंबुल अनेकदा नॉमिनेट झाली. मात्र प्रत्येकवेळी चाहत्यांच्या मतांच्या आधारावर ती बचावली. 

टॅग्स :सेलिब्रिटीटेलिव्हिजनबिग बॉस