Join us
Daily Top 2Weekly Top 5

Bigg Boss 17 : सुम्बुल तौकीरच्या वडिलांची ‘बिग बॉस १७’मध्ये एन्ट्री? लेक म्हणते...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2023 16:53 IST

Bigg Boss 17 : लेकीनंतर आता वडिलही गाजवणार टीव्ही शो? सुम्बुलचे वडील 'बिग बॉस १७'मध्ये दिसणार?

बिग बॉस हिंदी’चं १६वं पर्व अनेक कारणांमुळे चर्चेत राहिलं. सुम्बुल तौकीर ही या पर्वातील चर्चेतील चेहऱ्यांपैकी एक होती. या शोमुळे सुम्बुलप्रमाणेच तिच्या वडिलांनाही लोकप्रियता मिळाली. सुम्बुलचे वडील अनेकदा ‘बिग बॉस’च्या घरात दिसून आले. लेकीने ‘बिग बॉस’चं घर गाजवल्यानंतर आता तिचे वडील तौकीर हसन खान नव्या पर्वात सहभागी होणार असल्याची चर्चा रंगली आहे. ‘बिग बॉस’च्या टीमकडून सुम्बुलच्या वडिलांना या शोसाठी विचारण्यात आल्याचं वृत्त आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, ‘बिग बॉस १७’साठी सुम्बुलच्या वडिलांबरोबर बोलणं सुरू असल्याची माहिती आहे. ‘बिग बॉस’च्या नव्या पर्वात तौकीर हसन खान दिसण्याची शक्यता आहे. त्यांची धाकटी मुलगी सानियाशी संपर्क केला असता याबाबत सध्या काही सांगू शकत नाही, असं तिने सांगितल्याची माहिती नवभारत टाइम्सने दिली आहे. ‘बिग बॉस’च्या घरात मुलीला सल्ले देणाऱ्या सुम्बुलच्या वडिलांनी जर यंदाच्या पर्वात एन्ट्री घेतली, तर ते हा शो कसा खेळतात हे पाहणं रंजक ठरणार आहे.

‘चांद्रयान ३’ची खिल्ली उडवणं महागात पडलं, प्रकाश राज यांच्याविरोधात तक्रार दाखल

ऐश्वर्या रायबद्दल आक्षेपार्ह विधान करणं भोवलं; भाजपाच्या विजकुमार गावितांना महिला आयोगाची नोटीस

दरम्यान, सुम्बुलच्या वडिलांनी काही महिन्यांपूर्वीच दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधली. निलोफर असं त्यांच्या दुसऱ्या पत्नीचं नाव आहे. सुम्बुल सहा वर्षांची असतानाच तिच्या आईवडिलांचा घटस्फोट झाला होता. तेव्हापासून सुम्बुलच्या वडिलांनी तिचा व बहिणीचा एकट्याने सांभाळ केला. वडिलांच्या दुसऱ्या लग्नाचे फोटो सुम्बुलने शेअर केले होते.

टॅग्स :बिग बॉसटिव्ही कलाकार