Join us

गौरी-जयदीपच्या आयुष्यात येणार नवं वादळ?; 'सुख म्हणजे नक्की..'मध्ये विकास पाटीलची एन्ट्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2022 10:45 IST

Vikas patil: सध्या सोशल मीडियावर या मालिकेविषयीची एक पोस्ट व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये लवकरच या मालिकेत बिग बॉस मराठी फेम अभिनेता विकास पाटील (vikas patil) याची एन्ट्री होणार आहे.

छोट्या पडद्यावर गाजत असलेली मालिका म्हणजे 'सुख म्हणजे नक्की काय असतं' (sukh mhanje nakki kay asta).  उत्तम कथानकामुळे लोकप्रिय झालेल्या या मालिकेत अनेक ट्विस्ट अँड टर्न्स पाहायला मिळाले. त्यामुळे ही मालिका दिवसेंदिवस रंजक ठरत आहे. आतापर्यंत या मालिकेत अनेक नवीन कलाकारांची एन्ट्री झाली तर काही कलाकारांनी मालिकेतून काढता पाय घेतला. यामध्येच आता 'बिग बॉस मराठी'फेम (bigg boss marathi) अभिनेता या मालिकेत झळकणार आहे.

सध्या सोशल मीडियावर या मालिकेविषयीची एक पोस्ट व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये लवकरच या मालिकेत बिग बॉस मराठी फेम अभिनेता विकास पाटील (vikas patil) याची एन्ट्री होणार आहे. या मालिकेत विकास महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहे. त्यामुळे आता त्याच्या भूमिकेविषयी जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक झाले आहेत.

दरम्यान, या मालिकेत आतापर्यंत शिर्के-पाटील कुटुंबात अनेक चढउतार आल्याचं पाहायला मिळालं. मात्र, या संकटाच्या परिस्थितीमध्येही गौरी खंबीरपणे उभी राहिली. त्यामुळे गौरी सध्या विशेष लोकप्रिय ठरत असल्याचं दिसून येत आहे. 

टॅग्स :बिग बॉस मराठीटेलिव्हिजनटिव्ही कलाकार