'सुख म्हणजे नक्की काय असतं' फेम अभिनेता कपिल होनरावने नुकतंच त्याच्या मुंबईतील हक्काच्या नव्या घरात गृहप्रवेश केला. मुंबईत स्वत:चं घर असण्याचं इतक्या वर्षांचं त्याचं स्वप्न आता पूर्ण झालं आहे. कामासाठी मुंबईत आलेला कपिल १५ वर्ष भाड्याच्या घरात राहिला. त्यानंतर त्याने गेल्यावर्षीच स्वत:चं घर घेतलं. पण, मुंबईत आपलं स्वत:चं घर झालं आहे, यावर त्याचा अजूनही विश्वास बसत नाहीये.
कपिलने त्याच्या इन्स्टाग्रामवरुन गृहप्रवशेचा व्हिडीओ शेअर करत पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये तो म्हणतो, "स्वप्न ते सत्य...दोन दिवस झाले आजही , हे सत्य आहे की स्वप्न तेच समजत नाही... स्वतः लाच अजून विश्वास बसत नाही. १५ वर्ष भाड्याच्या घरात राहून इतकी सवय झालिये की एक हंगर लटकवण्यासाठी घर मालकाची परवानगी घायवी लागत होती. कालपासून घर सेट करताना, तिथे नको...आधी विचारूया हे अपसुक बोलून जात होतो".
"आई वडिलांचा आशीर्वाद , रेनूची साथ आणि लहान भाऊ-बहिणीचं भक्कम पाठबळ ह्या मुळे हे सगळं शक्य झालं. आपल्या आईवडिलांना आपला अभिमान वाटतो, त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून सतत भरून येत होतं. माझ्या बायकोशिवाय हे शक्यच झालं नसतं. माझा संघर्ष फक्त माझा एकट्याचा नव्हता तर तो तितकाच तिचाही होता आणि शेवटी तुम्ही सगळ्यांनी मला माझ्या पाहिल्याच सीरियलला माझ्या रोलला इतका भरभरून प्रतिसाद दिलात की आज हे मी अचिव्ह करू शकलो", असंही त्याने पुढे म्हटलं आहे.
Web Summary : Actor Kapil Honrao, of 'Sukh Mhanje Nakki Kay Asta' fame, fulfilled his dream of owning a Mumbai home after 15 years of renting. He expressed disbelief and gratitude for his family's support.
Web Summary : अभिनेता कपिल होनराव ने 15 साल किराए पर रहने के बाद मुंबई में अपना घर खरीदा। 'सुख म्हणजे नक्की काय असतं' फेम अभिनेता ने परिवार के समर्थन के लिए आभार व्यक्त किया।