Join us
Daily Top 2Weekly Top 5

३० खोल्यांच्या हवेलीत लहानाचा मोठा झाला 'हा' लोकप्रिय अभिनेता, म्हणाला "मध्यमवर्गीय लोक... "

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2025 12:42 IST

नेमका कोण आहे हा अभिनेता? वाचा सविस्तर...

सुधांशू पांडे हा (Sudhanshu Pandey) अनेकदा चर्चेत असतो. मॉडेल म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या सुधांशू पांडेने केवळ टीव्हीच नाही तर अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्येही आपली क्षमता सिद्ध केली आहे. अलीकडेच सुधांशू पांडे अमेझॉन प्राइमच्या रिअ‍ॅलिटी शो 'द ट्रेटर्स'मध्ये दिसला होता. आज यशाच्या शिखरावर असला तरी सुधांशू हा त्यांच्या मुळच्या मातीशी आजही घट्ट जोडलेला आहे. आज तो मुंबईसारख्या गजबजलेल्या शहरात राहतोय. पण, त्याच्या मुळ गावी ३० खोल्यांच्या हवेलीत तो लहानाचा मोठा झालाय. 

सुधांशू पांडेने नुकतंच वरिंदर चावलाच्या यूट्यूब चॅनलला मुलाखत दिली. यावेळी अभिनेत्यानं त्याच्या पार्श्वभूमीबद्दल सांगितलं. तो म्हणाला, "मला वाटते की आपल्यासारख्या लोकांची सर्वात मोठी ताकद आपली पार्श्वभूमी आहे आणि ती पार्श्वभूमी खूप साधी आणि मध्यमवर्गीय पार्श्वभूमी आहे. मला नेहमीच वाटतं की तीच माझी ताकद आहे. कारण, मला माझं सत्य माहिती आहे. मला माहित आहे की मी कुठून आलो आहे".

पुढे तो म्हणाला, "आम्ही मुळचे उत्तराखंडचे आहोत, पण माझं वडिलोपार्जित घर गोरखपूरमध्ये आहे, ती ३० खोल्यांची हवेली होती. आमच्याकडे खूप गायी होत्या. मी त्या मध्यमवर्गीय कुटुंबातून आलोय.  माझी आई शीख आहे. तर तिचे सगळे नातेवाईक हे सर्व विदेशात वास्तव्याला आहेत. पण, तरीही ते खूप साधे आणि सरळ आहेत. त्यामुळे कुटुंबाकडून मिळालेला साधेपणा हाच माझा पाया आहे. तो पाया इतका मजबूत आहे की तो आयुष्याच्या कोणत्याही टप्प्यावर डगमगलो नाही". 

टॅग्स :सेलिब्रिटीटिव्ही कलाकार