Join us

"मी सोहमला सांगितलंय लग्नानंतर वेगळं राहायचं...", सुचित्रा बांदेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "एकत्र राहून रोज..."

By कोमल खांबे | Updated: August 24, 2025 18:16 IST

लवकरच बांदेकरांच्या घरातही सनई चौघडे वाजणार आहेत. सोहम बांदेकर लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सुचित्रा यांनी लेकाच्या लग्नाबद्दल भाष्य केलं. 

बांदेकर कुटुंब हे मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय कुटुंब आहे. आदेश बादंकेर आणि सुचित्रा बांदेकर हे कलाविश्वातील लोकप्रिय आणि आदर्श कपल आहे. गेली कित्येक वर्ष ते दोघेही प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. आईवडिलांच्याच पावलावर पाऊल ठेवत सोहमनेही मराठी सिनेइंडस्ट्रीत पाऊल ठेवलं. आता लवकरच बांदेकरांच्या घरातही सनई चौघडे वाजणार आहेत. सोहम बांदेकर लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सुचित्रा यांनी लेकाच्या लग्नाबद्दल भाष्य केलं. 

सुचित्रा बांदेकर यांनी नुकतीच राजश्री मराठीला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्या म्हणाल्या, "सोहमचं लग्न माझ्यासाठी प्रायोरिटी आहे. मला वाटतं की मुलांनी वेळेत सेटल व्हायला हवं. का उगाच वेळ काढायचा? तुमच्या आयुष्याची छान इनिंग सुरू होते. मला नेहमी असं वाटतं की तुम्ही जेवढं उशीरा लग्न करता तेवढं तुमच्या डोक्यात सगळं पक्कं झालेलं असतं. आणि मग तुमची अॅडजस्टमेंट लेव्हल कमी होते. तर तसं मला नकोय. लग्न ही कॉन्सेप्ट इतकी छान आहे की दोघांनी मिळून तुमचं आयुष्य सुरू करायचं असतं. आदेशच्या आईचं असं म्हणणं होतं की लग्न झाल्यावर मुलांनी वेगळं राहायचं. तुमचा संसार तुम्ही करायचा. तुम्हाला काही लागलं तर मी आहे. मी पण त्याच कॉन्सेप्टची आहे. मी सोहमला सांगितलंय की लग्नानंतर वेगळं घर शोधा. वेगळ्या घरी मस्त मजेच राहा. आईबाबा आहेतच. तिचंही माहेर आहे. त्यामुळे तिचेही आईबाबा आहेत. एकत्र राहून रोज चकचक करायचं. मी इतकी वर्ष माझं घर सांभाळलेलं आहे. आता तुम्ही तुमचं करा".

दरम्यान, सोहम अभिनेत्री पूजा बिराराशी लग्न करणार असल्याच्या चर्चा आहेत. पूजा हा मराठी टेलिव्हिजनचा लोकप्रिय चेहरा आहे. 'स्वाभिमान शोध अस्तित्वाचा' या मालिकेतून तिला प्रसिद्धी मिळाली. या मालिकेत तिने मुख्य भूमिका साकारली होती. सध्या पूजा 'येड लागलं प्रेमाचं' मालिकेत मुख्य भूमिका साकारत आहे.  

टॅग्स :टिव्ही कलाकारसेलिब्रेटी वेडिंगआदेश बांदेकर