Join us
Daily Top 2Weekly Top 5

'अग्गंबाई सासूबाई'मध्ये आजोबा अभिजीत राजेऐवजी आसावरीचं लग्न लावणार ह्या व्यक्तीशी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2019 14:44 IST

'अग्गंबाई सासूबाई' मालिका रंजक वळणावर आली आहे.

'अग्गंबाई सासूबाई' या मालिकेने अल्पावधीतच रसिकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं आहे. सध्या मालिका रंजक वळणावर आली आहे. अभिजीत राजे व आसावरी यांचे एकमेकांवर प्रेम आहे हे घरात आजोबांना सोहम सांगतो. त्यानंतर आजोबा आसावरीवर खूप भ़डकतात आणि उंबरठा न ओलंडण्याचा व स्वयंपाक घरात न जाण्याचे आदेश देतात. तरीदेखील अभिजीत राजे आजोबांचा लग्नासाठी होकार मिळवण्यासाठी धडपडत असतात.

नुकताच प्रसारीत झालेल्या 'अग्गंबाई सासूबाई' मालिकेत बिल्डिंगखाली तंबू ठोकून ठाण मारून बसलेल्या अभिजीत राजेंना तिथून हकलवून लावण्यासाठी आजोबा खूप प्रयत्न करतात. मात्र सोहम जाणून बुजून त्याचा डब्बा अभिजीत राजेंना देतो. त्यांना डब्ब्यात आपल्याच घरात बनवलेली शेवग्याच्या शेंग्याची भाजी खाताना पाहून आजोबांचा संताप अनावर होतो. ते राजेंचा तंबू तोडून टाकतात. शुभ्रा व आसावरी धावत खाली येतात. तिथेदेखील आसावरी उबंरठा ओलांडून आली म्हणून आजोबा तिला खूप घालून पाडून बोलतात. तिथून आजोबा गेल्यावर आसावरी राजेंना खूप समजावते आणि तिथून जाण्यास सांगते. आसावरी जे काही बोलते ते ऐकून राजे आजोबांच्या परवानगीने लग्न करण्याचा निर्णय घेतात आणि निघून जातात. तर घरात शुभ्रा आजोबांना आसावरी व अभिजीत राजेंच्या नात्याला समंती द्यावी म्हणून समजवत असते. त्यामुळे पुढे काय घडणार हे पाहणे कमालीचे ठरणार आहे.

झी मराठीच्या इंस्टाग्राम अकाउंटवर अग्गंबाई सासूबाईचा प्रोमो शेअर करण्यात आला आहे. त्यात आजोबा आसावरीसाठी मुलगा शोधतात. आसावरीला मुलगा आवडला का, असे विचारतात. त्यामुळे आजोबा आसावरी व अभिजीत राजेंचे नाते स्वीकारतील की नाही हे आगामी भागात कळेल.

टॅग्स :अग्गंबाई सासूबाईझी मराठी