भारतातच नाही तर जगभरात प्रसिद्ध असलेला स्टॅण्डअप कॉमेडिअन झाकिर खान आता मोठ्या ब्रेकवर जात आहे. त्याच्या या निर्णयामुळे चाहत्यांना धक्काच बसला आहे. सध्या झाकिरचे पुढील काही महिन्यांपर्यंत देशात आणि परदेशात लाईव्ह शो शेड्युल आहेत. त्यानंतर तो एक दोन वर्षांसाठी नाही तर ५ वर्षांसाठी विश्रांती घेणार आहे. याचं कारणही त्याने नुकतंच एका स्टॅण्डअप शोनंतर प्रेक्षकांना सांगितलंय.
झाकिर खानचा सध्या 'पापा यार' हा शो गाजत आहे. यासाठी तो अनेक ठिकाणी फिरत आहे आणि त्याला प्रेक्षकांचा कमालीचा प्रतिसाद मिळत आहे. अमेरिका, लंडनसह परदेशातील अनेक शो हाऊसफुल आहेत. नुकताच झाकिरचा हैदराबाद येथे शो झाला. यावेळी त्याने ५ वर्षांचा ब्रेक घेत असल्याचा खुलासा केला. तो म्हणाला, "मी आता मोठ्या ब्रेकवर जात आहे. कदाचित २०२८-२९ किंवा २०३० पर्यंतही विश्रांती घेऊ शकतो. आरोग्याची काळजी घ्यायची आहे आणि इतरही काही गोष्टी आहेत. आज इथे उपस्थित तुम्ही सगळेच माझ्या हृदयाजवळ आहात. तुमची उपस्थिती माझ्यासाठी किती महत्वाची आहे हे मी सांगू शकत नाही. मी नेहमीच तुमचा आभारी असेन. धन्यवाद."
झाकिरने इन्स्टाग्रामवर स्टोरीवर दुबईच्या बुर्ज खलिफाचा फोटो शेअर करत लिहिले, "२० जूनपर्यंतचा प्रत्येक शो हा साजरा होईल. मी आता जास्त शहरांमध्ये येऊ शकणार नाही. त्यामुळे तुम्हीच थोडे कष्ट घेऊन या. तुम्ही माझ्यावर इतकं प्रेम केलंत त्यासाठी खूप आभार."
याआधीही झाकिरने ब्रेक घेत असल्याची हिंट दिली होती. सतत वेगवेगळ्या शहरात, देशात दौरे, झोपण्याच्या खाण्यापिण्याच्या वेळेत बदल यामुळे आरोग्यावर परिणाम होत असल्याचं तो म्हणाला होता. गेल्या १० वर्षांपासून झाकिर एकामागोमाग टूर, शोज करत आहे. यामुळेच आता त्याने थेट ५ वर्षांचा ब्रेक घेतला आहे. तर दुसरीकडे झाकिर लग्न करतोय का अशाही चर्चा सोशल मीडियावर रंगल्या आहेत.
Web Summary : Popular comedian Zakir Khan is taking a five-year break from shows after his 'Papa Yaar' tour. Citing health concerns and a decade of constant touring, he expressed gratitude to his fans, hinting at a possible return around 2028-2030. Marriage rumors also circulate.
Web Summary : लोकप्रिय कॉमेडियन ज़ाकिर खान अपने 'पापा यार' दौरे के बाद शो से पांच साल का ब्रेक ले रहे हैं। स्वास्थ्य संबंधी चिंताओं और लगातार एक दशक के दौरे का हवाला देते हुए, उन्होंने अपने प्रशंसकों के प्रति आभार व्यक्त किया, और लगभग 2028-2030 तक संभावित वापसी का संकेत दिया। शादी की अफवाहें भी चल रही हैं।