Join us
Daily Top 2Weekly Top 5

Splitsvilla X6 मध्ये महिला स्पर्धकांमध्ये हाणामारी; कपडे फाटेपर्यंत झाला वाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2026 11:21 IST

Splitsvilla X6: शो सुरु झाल्यानंतर दिक्षा आणि आकांक्षा यांच्यात चांगली मैत्री होती. मात्र, जसजसा हा शो पुढे सरकू लागला तसतशी त्यांच्या मैत्रीत फूट पडली.

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय डेटिंग रिअॅलिटी शो Splitsvilla X6  सुरु झाल्यापासून सतत या ना त्या कारणामुळे चर्चेत येत आहे. या शोमध्ये देशभरातील अनेक स्पर्धक सहभागी झाले असून हा शो दिवसेंदिवस रंजक होतांना दिसत आहे. यामध्येच आता या शोमधील दिक्षा पवार आणि आकांक्षा चौधरी या दोन महिला स्पर्धकांमध्ये जबरदस्त वाद झाला आहे. हा वाद फक्त शाब्दिक नसून दोघींमध्ये हाणामारी देखील झाल्याचं पाहायला मिळालं.

Splitsvilla X6 हा शो सुरु झाल्यानंतर दिक्षा आणि आकांक्षा यांच्यात चांगली मैत्री होती. मात्र, जसजसा हा शो पुढे सरकू लागला तसतशी त्यांच्या मैत्रीत फूट पडली. परिणामी, या दोघी सध्या एकमेकींचं तोंडही पाहणं पसंत करत नाहीत. नुकताच Splitsvilla X6 चा एक प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमध्ये दोघींमध्ये जबरदस्त वाद झाले असून त्यांनी एकमेकींचे कपडे फाटेपर्यंत हाणामारी केली.

व्हायरल होत असलेल्या प्रोमोमध्ये दिक्षा, आकांक्षाला तिच्या सगळ्या कपड्यांना आग लावून टाकेन, अशी धमकी देते. यावर, आकांक्षाही तिला प्रत्युत्तर देते. परिणामी, दिक्षाचा राग अनावर होतो आणि ती खरोखरच आकांक्षाचे सगळे कपडे बाहेर फेकून देते. तिच्या या वर्तनामुळे आकांक्षा आणि सुझैन दोघींनाही राग अनावर होतो. दिक्षा आणि आकांक्षाच्या वादात सुझैन उडी घेते. या दोघींच्या भांडणामध्ये सुझैन सुद्धा दिक्षाचे कपडे फेकून देते. ज्यामुळे हा वाद आणखीनच चिघळतो.

कपडे फाटेपर्यंत झाली हाणामारी

सुझैनने केलेल्या या कृतीमुळे दिक्षाचा राग आणखीनच विकोपाला जातो आणि ती पुन्हा आकांक्षासोबत भांडायला लागते. यामध्येच दिक्षा रागाच्या भरात आकांक्षासोबत हाणामारी करु लागते. या वादात आकांक्षाचे कपडेही फाटतात.

दरम्यान, सोशल मीडियावर सध्या Splitsvilla X6 चा हा प्रोमो मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. यात अनेकांनी दिक्षाला ट्रोल केलंय. तर, काहींनी आकांक्षाला सपोर्ट केला आहे. या शोमध्ये आकांक्षा चौधरी, अंजली श्मक, अनीशा शिंदे, दिक्षा पवार, सदाफ शंकर, सौंदर्या शेट्टी, सिमरन खान, चक्षदीप सिंह, योगेश रावत, सोराब बेदी, अनुज शर्मा, टेने डी'विलियर्स, आयुष शर्मा, हर्षित गुरुरानी , हिमांशु अरोरा, केओना वाल्के, खुशी रावल, जालक गोहिल, प्रीत सिंह, अनुष्का घोष, अस्मिता अधिकारी, कैरा अनु, निहारिका तिवारी, कुशल तंवर (गुल्लू), आरव चुघ, विशु बजाज, आयुष जामवाल, गौरेश गुजराल, रॉन करियप्पा, दीप्तांशु सैनी आणि मोहित मगोत्रा हे स्पर्धक सहभागी झाले आहेत. विशेष म्हणजे सनी लिओनी आणि करण कुंद्रा या शोचे होस्ट आहेत. त्यांच्यासोबत निया शर्मा आणि उर्फी जावेददेखील पाहायला मिळतात. 

English
हिंदी सारांश
Web Title : Splitsvilla X6: Female contestants brawl, clothes torn in major fight.

Web Summary : Splitsvilla X6 witnesses a massive fight between Diksha Pawar and Akanksha Choudhary. The argument escalates, leading to physical violence and torn clothes. The promo video is going viral, sparking mixed reactions online.
टॅग्स :टेलिव्हिजनटिव्ही कलाकारसनी लिओनीकरण कुंद्रानिया शर्मा