Join us
Daily Top 2Weekly Top 5

Mayank Pawar Death: 'स्प्लिट्सव्हिला'फेम मयंक पवारचं निधन, 'फिटनेस फ्रीक' असूनही ३७ व्या वर्षीच घेतला अखेरचा श्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2026 17:29 IST

Splitsvilla 7 Contestant Mayank Pawar Death: टीव्ही रिएलिटी जगतातून एक वाईट बातमी आली आहे

टीव्ही रिएलिटी जगतातून एक वाईट बातमी आली आहे. 'एमटीव्ही स्प्लिट्सव्हिला'च्या सातव्या सीझनमध्ये दिसलेला सर्वात चर्चेतला चेहरा मयंक पवारचं निधन झालं आहे. तो फक्त ३७ वर्षांचा होता. मयंक पवारच्याच इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन ही दु:खद बातमी देण्यात आली आहे. या बातमीनंतर त्याच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. 

इन्स्टाग्राम पोस्टवर श्रद्धांजली देताना त्याच्या टीमने लिहिले, "एक भाऊ, एक चॅम्पियन, एक मार्गदर्शक आणि अनेक लोकांसाठी प्रेरणा असलेला मयंक पवार आपल्या स्मरणात कायम राहील." मयंक फक्त एक टीव्ही सेलिब्रिटी नव्हता तर शिस्त आणि मेहनतीमुळे तो फिटनेसबाबतीत अनेक तरुणांसाठी आदर्श होता. फिटनेस जगतात त्याचं मोठं नाव होतं. सात वेळा त्याने 'मिस्टर इंडिया' खिताब जिंकला होता. त्याने आपल्या प्रवासातून अनेक लोकांना सकारात्मक दृष्टिकोन दिला. मात्र अचानक त्याच्या निधनाने आता फिटनेस, किलर बॉडी यावरुन चर्चा सुरु झाली आहे. टीमने  अद्याप त्याच्या मृत्यूचं कारण स्पष्ट केलेलं नाही. 

२५ फेब्रुवारी म्हणजेच उद्या मयंक पवारच्या आठणवीत शोकसभा आयोजित करण्यात आली आहे. सोशल मीडियावर अनेक जण त्याला श्रद्धांजली वाहत आहेत. एकाने लिहिले, 'काही दिवसांपूर्वीच मी त्याचा स्प्लिट्सव्हिला ७ चा प्रवास पाहत होतो. माझा विश्वासच बसत नाहीये'. तर काहींनी त्याच्या निधनाच्या बातमीचा आधार घेत सप्लिटमेंट्स वापरण्यावरुन चिंता व्यक्त केली आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Splitsvilla Fame Mayank Pawar Passes Away at 37

Web Summary : Mayank Pawar, known from MTV Splitsvilla 7, has died at 37. His Instagram announced the news, shocking fans. A fitness enthusiast and Mr. India winner, his team mourned the loss of a champion. The cause of death is currently unknown. A memorial service will be held.
टॅग्स :टिव्ही कलाकारमृत्यू