Join us

Video: गाणं सुरु झालं अन्...; व्हिडीओ शूटच्या वेळी झाली सोनालीची फजिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2022 16:19 IST

Sonali patil: या व्हिडीओमध्ये सोनालीची फजिती झालेली असतानाही तिचा हा व्हिडीओ लोकप्रिय झाला.

'बिग बॉस मराठी 3' (bigg boss marathi 3) माध्यमातून घराघरात पोहोचलेली लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे सोनाली पाटील (sonali patil). उत्तम अभिनयशैली आणि स्वभावातील खट्याळपणा यामुळे सोनालीने अल्पावधीत प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. त्यामुळे तिच्याविषयी प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. यात सोनालीदेखील चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी कायम सोशल मीडियाचा आधार घेत असते. विशेष म्हणजे सोनालीने कोणताही व्हिडीओ किंवा इन्स्टा रिल शेअर केलं की ते क्षणार्धात व्हायरल होतं. परंतु, यावेळी एक इन्स्टा रिल करताना तिची चांगलीच फजिती झाल्याचं पाहायला मिळालं.

सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या सोनालीने अलिकडेच इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ अपलोड केला. या व्हिडीओमध्ये ती इन्स्टा रिल करण्याच्या तयारीत असल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र, सोनाली या रिलसाठी तयार होण्यापूर्वीच गाणं सुरु होतं आणि तिची ऐनवेळी फजिती होते. त्यामुळे पूर्ण तयारी नसताना जर गाणं सुरु झालं तर कशी फजिती होते हे तिने सांगायचा प्रयत्न केला आहे.

"सगळ्यांसमोर जेव्हा रिल करतो आणि काऊंट न होता डायरेक्ट गाणं लागतं तेव्हा...", असं कॅप्शन देत सोनालीने तिची झालेली फजिती सांगितली आहे. 

दरम्यान, या व्हिडीओमध्ये सोनालीची फजिती झालेली असतानाही तिचा हा व्हिडीओ लोकप्रिय झाला. अनेकांनी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. बिग बॉस मराठीच्या माध्यमातून विशेष लोकप्रिय झालेल्या सोनालीने अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलं आहे. यात 'जुळता जुळता जुळतयं की', घाडगे अँड सून, देव पावला, 'देवमाणूस' आणि 'वैजू नं.१' यासारख्या मालिकांमध्ये तिने महत्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत.

टॅग्स :सेलिब्रिटीटेलिव्हिजन