Join us
Daily Top 2Weekly Top 5

'...तर मी आता कुठे असते', अभिनेत्री स्नेहा वाघची 'ती' पोस्ट चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2022 15:51 IST

Sneha Wagh :अभिनेत्री स्नेहा वाघ नेहमीच तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत येत असते.

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री स्नेहा वाघ (Sneha Wagh) बिग बॉस मराठी(Bigg Boss Marathi 3)च्या तिसऱ्या सीझनमध्ये सहभागी झाला होती. या शोमधून ती खूप चर्चेत आली होती. ती नेहमीच तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत येत असते. स्नेहा वाघ सोशल मीडियावरीही सक्रीय आहे. नुकतेच स्नेहा वाघ हिने तिच्या पहिल्या मराठी मालिकेच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

स्नेहा वाघने नुकतंच इन्स्टाग्रामवर फोटो शेअर केले आहेत आणि तिच्या पहिल्या मालिकेबद्दल सांगितले आहे. तिने ईटीव्ही मराठी वाहिनीवरील काटा रुते कुणाला या मालिकेत मुख्य भूमिका साकारली होती. तिने या मालिकेच्या आठवणी शेअर केल्या आहेत. तिने लिहिले की, जर टीव्हीशिवाय एखादा दिवस असेल तर मला माहिती नाही की मी आता कुठे असते. एक अभिनेत्री म्हणून मी माध्यमात होणारे बदल आणि त्यात होणारी वाढ या गोष्टी पाहिल्या आहेत. पण यातील एकच गोष्ट कायम असते आणि ती म्हणजे कनेक्टिव्हिटी!

ती पुढे म्हणाली की, आम्हा कलाकारांमधील असलेले बंध आणि अर्थातच तुम्ही आमच्यावर केलेले प्रेम हे फार महत्त्वाचे आहे. जागतिक दूरचित्रवाणी दिनानिमित्त जेव्हा मी या सुंदर प्रवासाकडे मागे वळून पाहते, तेव्हा मी प्रचंड इमोशनल होते. माझे हृदय प्रेमाने भरलेले असते. या प्रवासात माझी साथ देणाऱ्या तुमच्या प्रत्येकाचे आभार.

स्नेहा वाघला सिनेइंडस्ट्रीत १३ वर्षे झाली आहेत. तिने झी मराठीवरील ‘अधुरी एक कहानी’ या मालिकेत अर्पिता ही भूमिका केली होती. तिने ईटीव्ही मराठी या वाहिनीवरील ‘काटा रुते कुणाला’ या मालिकेत मुख्य अभिनेत्रीची भूमिका साकारली होती. त्यानंतर तिने ‘ज्योती’, ‘ढोलकीच्या तालावर’, ‘चंद्रशेखर’, ‘मेरे साई’ यांसारख्या अनेक मालिकेत काम केले आहे. त्यानंतर ती ‘बिग बॉस मराठी’च्या तिसऱ्या सीझनमध्ये पाहायला मिळाली. 

टॅग्स :स्रेहा वाघबिग बॉस मराठी