Join us
Daily Top 2Weekly Top 5

म्हणून सूत्रसंचालन करताना अस्वस्थ झाला आशुतोष राणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2019 12:59 IST

‘स्टार भारत’वरील ‘सावधान इंडिया’ कार्यक्रमाचा सूत्रसंचालक अभिनेता आशुतोष राणा करणार आहे.

‘स्टार भारत’वरील ‘सावधान इंडिया’ कार्यक्रमाचा सूत्रसंचालक अभिनेता आशुतोष राणा करणार आहे. या मालिकेतील एका भागातील प्रसंगाचे निवेदन करताना आशुतोष मनातून खूप अस्वस्थ झाला होता.

एका भागात दाखविण्यात आले होते की समाजात महिलांवरील वाढत्या अत्याचारांपासून आपली पत्नी आणि मुलीचे संरक्षण करण्याच्या हेतूने एक माणूस त्यांना लोखंडी साळखीने बांधून ठेवत असे. त्याला या दोघींची काळजी वाटत होती.  मात्र त्यांना साखळीने बांधून ठेवल्यामुळे त्या सुरक्षित राहतील, अशी त्याची समजूत बनली होती. या भागासाठी निवेदन करतानाच्या अनुभवावर आशुतोष म्हणाला, “ही कथा ऐकल्यावर मी मनातून खूप अस्वस्थ झालो होतो. हा गुन्हेगार या महिलांचे रक्षण करण्याच्या नादात त्यांची छळवणूक करीत होता पण त्याची त्याला कल्पनाही नव्हती. पण अशा घटनांना काही प्रमाणात समाजच कारणीभूत असून त्यासाठीच समाजाच्या दृष्टिकोनात बदल घडवून आणणं गरजेचं आहे. या माणसाने आपली पत्नी आणि मुलीला समाजात घडणाऱ्या महिलांवरील अत्याचारांबाबत जागरूक करणं गरजेचं होतं, त्यांना साखळीने बंद करून ठेवणं चुकीचं होतं. विविध गुन्ह्यंबद्दल नागरिकांमध्ये जागृती करणं गरजेचं आहे, त्यामुळे तशी परिस्थिती निर्माण झाल्यास त्यांना कळेल की ते कोणत्या गुन्ह्याचा सामना करीत आहेत.” या शोच्या पूर्वीचे भागाचे सूत्रसंचालन अभिनेता सुशांत सिंहने केले होते. आपल्या वैविध्यपूर्ण भूमिका आणि ‘सावधान इंडिया’सारख्या गुन्हेगारीविषयक मालिकेचे सूत्रसंचालन करण्यामुळे तो प्रसिध्द आहे. 

टॅग्स :आशुतोष राणारेणुका शहाणे