Join us
Daily Top 2Weekly Top 5

२१व्या वर्षीही ग्लॅमरस दिसायची 'तुलसी'; स्मृती इराणींचा फोटो पाहून व्हाल अवाक्

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2024 09:24 IST

सध्या सोशल मीडियावर 'me at 21'हा ट्रेंड सुरू आहे. या ट्रेंडपासून स्मृती ईराणीही दूर राहू शकलेल्या नाहीत. सर्वांच्या लाडक्या तुलसीने जुना फोटो शेअर केला आहे.

सध्या सोशल मीडियावर 'me at 21'हा ट्रेंड सुरू आहे. अनेक जण त्यांचे २१व्या वर्षातील फोटो शेअर करत आहेत. या ट्रेंडने सेलिब्रिटींनाही भुरळ घातली आहे. कित्येक अभिनेत्रींनीही त्यांचे जुने फोटो शेअर केले आहेत. या ट्रेंडपासून स्मृती ईराणीही दूर राहू शकलेल्या नाहीत. सर्वांच्या लाडक्या तुलसीने जुना फोटो शेअर केला आहे. 

केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री असलेल्या स्मृती इराणी यांनी तुलसी म्हणून लोकप्रियता मिळवली. एकता कपूरच्या 'क्योंकी सास भी कभी बहू थी' या मालिकेतून त्या घराघरात पोहोचल्या. पहिल्याच मालिकेने त्यांना प्रसिद्धीझोतात आणलं. आजही त्यांची प्रेक्षकांच्या मनातील छबी कायम आहे. स्मृती इराणी या सोशल मीडियावर फार सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. नुकतंच त्यांनी त्यांच्या २१व्या वर्षातील फोटो शेअर करत चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. लाडक्या तुलसीचा ग्लॅमरस अवतार पाहून चाहतेही थक्क झाले आहेत. या फोटोवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. 

'क्योंकी सास भी कभी बहू थी' मालिकेतून प्रसिद्धी मिळवल्यानंतर स्मृती इराणींनी राजकारणात प्रवेश केला. २००३ साली भाजपात प्रवेश करत त्यांनी त्यांच्या राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली. २००४ साली त्यांनी लोकसभा निवडणुकीचं तिकीट मिळालं होतं. परंतु, त्या पराभूत झाल्या. त्यानंतर २०१४च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या राहुल गांधींविरोधात अमेठीमधून त्यांनी निवडणूक लढवत विजय मिळवला. आता त्या नरेंद्र मोदींच्या केंद्रीय मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री आहेत. 

टॅग्स :स्मृती इराणीटिव्ही कलाकार