Join us

श्रेयस तळपदे आणि प्रार्थना बेहरेने 'माझी तुझी रेशीमगाठ'च्या टीमसाठी 'सूर्यवंशी'चे ठेवले स्पेशल स्क्रीनिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2021 18:57 IST

अभिनेता श्रेयस तळपदे आणि अभिनेत्री प्रार्थना बेहरे यांनी 'माझी तुझी रेशीमगाठ' मालिकेतील टीमसाठी 'सूर्यवंशी' चित्रपटाचे स्पेशल स्क्रीनिंग ठेवले होते.

दिवाळीचा उत्साह सगळीकडे असताना अभिनेता श्रेयस तळपदे आणि अभिनेत्री प्रार्थना बेहरे यांनी माझी तुझी रेशीमगाठ मालिकेतील टीमसाठी सूर्यवंशी चित्रपटाचे स्पेशल स्क्रीनिंग ठेवले होते. माझी तुझी रेशीमगाठ मालिकेच्या टीमने ब्रेक घेत यंदाची दिवाळी स्पेशल करायची ठरवली. श्रेयस तळपदे आणि प्रार्थना बेहरेनने संपूर्ण टीमसोबत दिवाळी साजरी करण्यासाठी सूर्यवंशी चित्रपटाचे स्क्रीनिंग करायचे ठरविले. यावेळी आनंद काळे, शीतल क्षीरसागर, दिग्दर्शक अजय मयेकर, दीप्ती तळपदे यांच्यासोबत मालिकेची संपूर्ण टीम उपस्थित होती.

‘सूर्यवंशी’ सिनेमाची कथा आहे सूर्यवंशी या पोलिस अधिका-याची (Akshay Kumar). पत्नी (Katrina Kaif) आणि मुलापेक्षाही नोकरी प्रिय असलेल्या सूर्यवंशी मुंबई बॉम्ब ब्लास्टमध्ये आई-वडिलांना गमावून बसतो. यानंतर या बॉम्ब ब्लास्टचा मास्टरमाइंड बिलाल (कुमूद मिश्रा) आणि ओमर हफीज (जॅकी श्रॉफ) या दोघांना शोधून काढणं, हेच त्याच्या आयुष्याचं ध्येय बनतं. याचदरम्यान मुंबई बॉम्ब ब्लास्टसाठी प्रत्यक्षात 1000 किलो आरडीएक्स आलं होतं. त्यापैकी केवळ 400 किलो ब्लास्टसाठी वापरलं गेलं आणि उरलेलं 600 किलो आरडीएक्स अजूनही मुंबईत लपवून ठेवल्याची गुप्त माहिती त्याला मिळते. मुंबईत पुन्हा एका मोठ्या बॉम्बस्फोटाच्या कटाचे धागेदोरेही त्याच्या हाती लागतात. यानंतर सूर्यवंशी हा कट हाणून पाडण्यासाठी अक्षरश: जीवाचं रान करतो. सिंघम आणि सिम्बाची साथ त्याला मिळते. हे तिघं मुंबईला कसं वाचवतात, हे चित्रपटात दाखवण्यात आले आहे.

माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेने कमी कालावधीत प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेतील नेहा, यश आणि छोट्या परीला प्रेक्षकांची खूप पसंती मिळते आहे. 

टॅग्स :श्रेयस तळपदेप्रार्थना बेहरेसूर्यवंशी