बिग बॉस मराठीच्या घरात दर दिवशी नाही दर मिनिटाला नाही तर सेंकदाला स्ट्रॅटेजि बदलत असतात. यामध्ये कोणाचा गेम काय आहे, कोणाच्या मनामध्ये काय आहे, कोण कोणाच्या बाजूने आहे हे सांगण खूप कठीण असतं. प्रत्येक सदस्य आपल्या ग्रुपला, आपल्या जवळच्या माणसांना, स्वत:ला वाचवण्याच्या मागे असतो. आज जय आणि उत्कर्ष अशीच काही स्ट्रॅटेजि आखताना दिसणार आहेत. आता तो नक्की कोणाबद्दल आहे ? हे आजच्या भागामध्ये कळणार आहे.
त्याचा वीक पॉइंट आपल्याला माहिती आहे लगचे इमोशनल ब्रेकडाऊन होतो त्याचा. त्याला जास्त दिवस भाव नाही ना दिला तर तो एकटा पडणार. त्याला विचारायचे नाही, नको त्या कल्पनाही द्यायची गरज नाही. आता हे दोघे ज्या स्पर्धकांबद्दल खेळी आखतात. “तो” नक्की कोण आहे ? कोण आहे घरातला जोकर ? कोणाबद्दल जय आणि उत्कर्ष बोलत आहेत हे कळेलच.
आगामी भागात स्पर्धक एकमेकांची नक्कलही करताना दिसणार आहेत. सोनाली गायत्री दातारची नक्कल करताना दिसणार आहे. दिवसेंदिवस अधिकच घरातले तापमान चांगलेच तापणार आहे.बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आता सदस्यांमध्ये खरी स्पर्धा सुरू झालेली दिसून येते आहे.