Join us  

टीव्ही फेम 'गोपी बहू'च्या आयुष्यात घडली धक्कादायक घटना! पंतप्रधान मोदींना केली विनंती

By ऑनलाइन लोकमत | Published: March 01, 2024 7:05 PM

गोपी बहू फेम अभिनेत्री देवोलिनाने सोशल मीडियावर नरेंद्र मोदींना विनंती करुन धक्कादायक घटना सांगितली आहे

'साथ निभाना साथिया' मालिकेतील गोपी बहूच्या भूमिकेतील प्रसिद्ध अभिनेत्री देवोलिना ही सर्वांची लाडकी अभिनेत्री. देवोलिनाच्या आयुष्यात तिला हादरवणारी घटना घडली आहे. देवोलिनाच्या जवळच्या मित्राची अमेरिकेत हत्या करण्यात आलीय. त्यामुळे तिला जबर धक्का बसलाय. त्यामुळे देवोलिनाने पंतप्रधान मोदी आणि भारतीय परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर यांना या प्रकरणात लक्ष देण्याची विनंती केलीय.

देवोलिनाने पोस्ट शेअर करुन लिहीलं की,"माझा मित्र अमरनाथ घोष याची मंगळवारी संध्याकाळी अमेरिकेतील सेंट लुईस अकादमी परिसरात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. तो कुटुंबातील एकुलता एक मुलगा होता. त्याच्या आईचे 3 वर्षांपूर्वी निधन झाले होते. वडिलांचे बालपणीच निधन झाले."

देवोलिना पुढे म्हणाली, "आरोपीची ओळख अद्याप उघड झालेली नाही. कदाचित त्याच्या कुटुंबात त्याच्या काही मित्रांशिवाय आता कोण नाही. मित्र मूळचा कोलकाताला राहणारा होता. तो पीएचडी करत होता. संध्याकाळी फिरायला निघाला असता अचानक काही अज्ञात व्यक्तीने त्याच्यावर अनेक वेळा गोळ्या झाडल्या. अमेरिकेतील त्याचे काही मित्र मृतदेहावर हक्क सांगण्याचा प्रयत्न करत आहेत पण आजतागायत काहीही अपडेट नाही. निदान त्याच्या हत्येमागचे कारण तरी कळायला हवे." अशी पोस्ट देवोलिनाने केली.

टॅग्स :देवोलिना भट्टाचार्जीनरेंद्र मोदी