Join us
Daily Top 2Weekly Top 5

Shocking...! 'तुला पाहते रे' फेम ईशा उर्फ गायत्री दातारला चक्क एका महिलेनं केला अश्लील मॅसेज

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2019 13:48 IST

गायत्री दातारला सोशल मीडियावर एका महिलेनं अश्लील भाषेत मॅसेज पाठवला असून ही बाब तिने सोशल मीडियावर सांगितली आहे.

तुला पाहते रे मालिकेनं अल्पावधीतच रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. या मालिकेतील ईशा निमकर व विक्रांत सरंजामे आणि इतर पात्रांवर रसिकांना भरभरून प्रेम केलं. वर्षभरात या मालिकेनं प्रेक्षकांचा निरोप घेतला. एकीकडे प्रेक्षक तुला पाहते रे मालिका व त्यातील कलाकारांना मिस करत आहेत आणि त्यांचं प्रेम सोशल मीडियावर व्यक्त करत आहेत. मात्र या मालिकेतील ईशा म्हणजेच गायत्री दातार हिला एक वाईट अनुभव आला आहे. एका महिलेनं फेसबुकवर तिला अश्लील भाषेत मालिकेवरून मॅसेज पाठवला आहे. 

गायत्री दातार हिने हा अश्लील मॅसेज तिच्या इंस्टा स्टोरीवर शेअर केला आहे. हा मॅसेज खूपच घाणेरड्या भाषेत असून एका महिलेनं केला आहे. मात्र त्या महिलेचं अकाउंट खरे आहे की खोटे, हे समजू शकलेलं नाही. मात्र ही पोस्ट इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर करत गायत्री म्हणाली की, नुकताच हा मॅसेज फेजबुक पेजवर वाचला आणि मला धक्काच बसला. हे असं बोलण्याची गरज आहे का ? हे बरोबर आहे का? 

पुढे तिने म्हटलं की, मी हा मॅसेज प्रमोट करत नाही किंवा मला कुणाकडून मॅसेज यावा असाही हा मॅसेज शेअर करण्याचा अर्थ नाही. इथे त्या व्यक्तीचा फेसबुक अकाउंट आहे. या व्यक्ती विरोधात रिपोर्ट करा. आपली पावर दाखऊयात. 

‘तुला पाहते रे’ या मालिकेनं निरोप घेतल्यानंतर आता गायत्री प्रथमच निम्मा शिम्मा राक्षस या नाटकाद्वारे व्यावसायिक रंगभूमीवर पदार्पण करत आहे.

या नाटकात ती शहजादीच्या मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

याशिवाय ती कोल्हापूर डायरिज चित्रपटात झळकणार आहे. 

टॅग्स :गायत्री दातारतुला पाहते रेफेसबुकइन्स्टाग्राम