Join us

Shocking! 'बिग बॉस १९' मधून डबल एविक्शन; 'हे' दोन स्पर्धक गेले घराबाहेर, प्रेक्षक चिडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2025 08:43 IST

'बिग बॉस १९'मध्ये डबल एविक्शन झालं असून घरातील दोन स्ट्राँग स्पर्धकांचा बिग बॉसमधील प्रवास संपला आहे. त्यामुळे प्रेक्षकांचा राग अनावर झाला आहे

लोकप्रिय रिअॅलिटी शो 'बिग बॉस १९' (Bigg Boss 19) मध्ये येणाऱ्या 'वीकेंड का वार' एपिसोडमध्ये प्रेक्षकांना मोठा धक्का बसला आहे. घरात 'डबल एविक्शन' झालं आहे. या आठवड्यात फरहाना, नीलम गिरी, अशनूर कौर, गौरव खन्ना आणि अभिषेक बजाज हे पाच सदस्य नॉमिनेशनमध्ये डेंजर झोनमध्ये होते. मात्र, आता समोर आलेल्या रिपोर्ट्सनुसार, अभिनेता अभिषेक बजाज (Abhishek Bajaj) आणि अभिनेत्री नीलम गिरी (Neelam Giri) या दोघांना घराबाहेर जावं लागल्याचं समजतंय. 

'बिग बॉस तक' आणि 'द खबरी' यांसारख्या प्रसिद्ध फॅन पेजेसने ही बातमी शेअर केली आहे. या बातमीमुळे अनेक चाहत्यांना धक्का बसला आहे.  रिपोर्ट्सनुसार, एविक्शनची घोषणा करताना सलमान खानने गौरव खन्ना आणि फरहाना भट्ट यांना सेफ घोषित केले. त्यानंतर, सलमानने नुकताच घरात आलेल्या प्रणित मोरेला एक विशेष पॉवर दिली. प्रणितला अशनूर, अभिषेक आणि नीलम या तिघांपैकी एकाला वाचवण्याचा अधिकार मिळाला. प्रणितने या पॉवरचा वापर करत अशनूर कौरला वाचवलं, ज्यामुळे अभिषेक बजाज आणि नीलम गिरी हे दोघे घराबाहेर पडले. 

अभिषेक बजाज हा या सीझनमधील सर्वात मजबूत स्पर्धकांपैकी एक होता, असं अनेक चाहत्यांचं म्हणणं आहे. त्याचे एविक्शन शोसाठी मोठे नुकसान असल्याचं मत काही प्रेक्षकांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे या डबल एविक्शनवर प्रेक्षक चिडले आहेत. दरम्यान 'बिग बॉस १९' चा महाअंतिम सोहळा ७ डिसेंबर २०२५ रोजी होणार असल्याची चर्चा आहे आणि आता या शोमध्ये कोणतीही वाईल्ड कार्ड एन्ट्री होणार नसल्याचंही बोललं जात आहे. प्रणित मोरे आजारपणातून बरा होऊन 'बिग बॉस १९'मध्ये पुन्हा आल्याने चाहत्यांनी आनंद व्यक्त केलाय. आता या शोमध्ये ट्विस्ट अँड टर्न कसे रंगणार हे पाहायचं आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Double Eviction Shocks Bigg Boss 19 Viewers; Two Contestants Eliminated.

Web Summary : Bigg Boss 19 sees a shocking double eviction. Abhishek Bajaj and Neelam Giri are eliminated after Praneet More's power choice saved Ashnoor. Fans are upset, especially about Bajaj's exit. The finale is rumored for December 7, 2025, with no more wild card entries.
टॅग्स :बिग बॉस १९टेलिव्हिजनटिव्ही कलाकारसलमान खान